प्रज्ञा म्हात्रे, ठाणे : येत्या मंगळवारी २५ जून रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे. चंद्रोदयाच्यावेळी कृष्ण चतुर्थी असेल तर तो दिवस संकष्टी चतुर्थीचा मानला जातो. संकष्ट चतुर्थी मंगळवारी आली की तिला 'अंगारकी संकष्ट चतुर्थी ' म्हणतात. २०२७, २०३० मध्ये पुन्हा जूनमध्ये तर पुढील वर्षी म्हणजेच २०२५ साली ऑगस्ट महिन्यात अंगारकी संकष्टी चतुर्थी येणार असल्याची माहिती ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ दा.कृ. सोमण यांनी दिली.
गणेशभक्तांसाठी पुढील २१ अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या तारखा-
१. १२ ऑगस्ट २०२५२. ६ जानेवारी २०२६३. ५ मे २०२६४. २९ सप्टेंबर २०२६५. २२ जून २०२७६. ८ ऑगस्ट २०२८७. ५ डिसेंबर २०२८८. १ मे २०२९९. २२ जानेवारी २०२३१०. १८ जून २०३०११. १ ऑक्टोबर २०३०१२. २ डिसेंबर २०३११३. ३० मार्च २०३२१४. १७ मे २०३३१५. ११ ऑक्टोबर २०३३१६. २८ नोव्हेंबर २०३४१७. २७ मार्च २०३५१८. १३ मे २०३६१९. ९ सप्टेंबर २०३६२०. ३ फेब्रुवारी २०३७२१. २७ ऑक्टोबर २०३७
मंगळवार २९ जून रोजी आलेल्या अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त उपवासाच्या पदार्थांबरोबर खास उपवास थाळी उपहारगृह आणि मराठमोळ्या हॉटेल्समध्ये उपलब्ध करुन दिली जाणार आहे. सकाळी ९ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत ही थाळी उपलब्ध असेल असे हॉटेल मालक नंदन जोगळेकर यांनी सांगितले. यात उपवासाच्या पदार्थांबरोबर राजगिरा पूरी, उपवास बटाटा भाजी, आमरस उपवास कटलेट, काकडी कोशिंबीर, साबुदाणा पापड या पदार्थांचा समावेश असेल असे जोगळेकर यांनी सांगितले.