शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

भिवंडीत शुल्लक कारणाने तरुणाच्या डोक्यावर कोयत्याने वार 

By नितीन पंडित | Published: March 30, 2024 3:15 PM

शुभम झा, हर्ष मिश्रा, गणेश मारुती शिंदे उर्फ गणू व त्यांच्या सोबतचा एक अनोळखी इसम सर्व रा. गांधीनगर कामतघर असे मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या चौघांची नावे आहेत.

भिवंडी : शिल्लक कारणातून तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार केल्याची खळबळजनक घटना भिवंडीतील पारसनाथ कंपाऊंड परिसरात शुक्रवारी घडली आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.        शुभम झा, हर्ष मिश्रा, गणेश मारुती शिंदे उर्फ गणू व त्यांच्या सोबतचा एक अनोळखी इसम सर्व रा. गांधीनगर कामतघर असे मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या चौघांची नावे आहेत. तर नितीन नागप्‍पा नवले वय १८ वर्ष रा. गणेश नगर, कामतघर असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. जखमी नितीन हा आपला मित्र विक्रम नायक वय १८ वर्षे व रोहित कुशवाह व १९ वर्ष असे तिघेजण कामावरून घरी येत असताना आरोपी शुभम झा व त्याच्या इतर साथीदारांनी नितीन यास राज शहा यांच्यासोबत फिरण्यास मनाई केली असतानाही, तू त्याच्याबरोबर फिरतो या गोष्टीचा राग मनात धरत हर्ष मिश्रा याने नितीन यास पकडून ठेवत शुभम झा याने त्याच्याकडील कोयत्याने नितीनच्या डोक्यावर गंभीर दुखापत केली.

तसेच गणू याने विक्रम नायकच्या दिशेने कोयता फेकून मारला तर रोहित कुशवाह यास देखील शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. या मारहाण व हल्ल्या प्रकरणी नितीन नवले याने नारपोली पोलीस ठाण्यात शुभम झा, हर्ष मिश्रा व त्याचे साथीदार अशा चौघांवर नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस