- नितीन पंडित भिवंडी - पुणे येथील भुशी डॅम धरणातील पाण्यात वाहून गेलेल्या परिवाराच्या घटनेनंतर नदी नाले व ओढ्यांवर हौशी पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.असे असतांनाच शहरातील काही अल्पवयीन मुले कामवारी नदीपात्रात पोहण्यासाठी जात आहेत.या नदीत देखील अल्पवयीन मुलांसह नागरिकांचा बुडून मृत्यू झाल्याची अनेक घटना घडल्या आहेत. या नदी पात्रात गुरुवारी दुपारच्या सुमारास परिसरातील काही लहान अल्पवयीन मुले पोहण्यासाठी उतरले होते.तर काही या नदीपात्रातील खांबावरून नदीत उड्या मारत होते.ही बाब लक्षात आल्याने स्थानिकांनी या सर्व अल्पवयीन मुलांना नदीपात्रातून बाहेर काढून त्यांना कानाला धरून उठाबशा काढण्याची शिक्षा दिलेली आहे.जेणेकरून यापुढे ते पुन्हा या नदीपात्रात पोहण्यासाठी जाणार नाहीत.या घटनेचा व्हिडिओ सध्या शहरात समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला आहे.
भिवंडीत नदीपात्रात पोहण्यास गेलेल्या अल्पवयीन मुलांना स्थानिकांनी केली उठाबशा काढण्याची शिक्षा; व्हिडिओ व्हायरल
By नितीन पंडित | Published: July 04, 2024 7:43 PM