उल्हासनगर : नंदू ननावरे पतीपत्नी आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आमदार बालाजी किणीकर यांचे स्वीयसहायक शशिकांत साठेसह चौघांच्या पोलीस कस्टडीत न्यायालयाने २८ ऑगस्ट पर्यंत वाढ केली. तर मुख्य आरोपीनी २८ ऑगस्ट पर्यंत अंतरिम जमीन घेतल्याने, त्यांचीही चौकशीनंतर अटक होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-४, आशेळेपाडा येथे राहणारे नंदू ननावरे हे माजी आमदार पप्पु कलानी व ज्योती कलानी यांचे स्वीयसहायक म्हणून काम केले. त्यानंतर माजी आमदार पप्पु कलानी व शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर यांचे मंत्रालयातील कामे करीत होते. १ ऑगस्ट रोजी दुपारी पत्नीसह राहत्या घराच्या तिसऱ्या मजल्यावरून ननावरे यांनी उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्या पूर्वी पतीपत्नीने एक व्हिडिओ काढून विशिष्ठ नागरिकांना पाठविला. त्यामध्ये आत्महत्यास रणजितसिंह नाईक निंबाळकर, संग्राम निकाळजे व दोघा देशमुख वकील बंधूंचा उल्लेख आहे. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात या चौघावर गुन्हा दाखल झाला. दरम्यान तपास होत नसल्याच्या निषेधार्थ ननावरे यांचा लहान भाऊ धनंजय ननावरे याने हाताचे बोट कापून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेट देणार असल्याचा व्हिडीओ व्हायरल केल्यावर तपासाचे सूत्र हलले.
विठ्ठलवाडी पोलिसांकडून ठाणे खंडणी विरोधी पथकाकडे गुन्हा वर्ग झाल्यावर, पथकाने मुख्य आरोपी ऐवजी सापडलेल्या चिट्टीत उल्लेख असलेल्या शिवसेना शिंदेगटाचे आमदार बालाजी किणीकर यांचे स्वीयसहायक शशिकांत साठे यांच्यासह पप्पु कलानी यांचे कट्टर समर्थक कमलेश निकम, नरेश गायकवाड व शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी मारोती कांबळे यांना अटक केली. गुरवारी त्यांना उल्हासनगर न्यायालयाने २८ ऑगस्ट पर्यन्त पोलीस कस्टडी वाढ केल्याची माहिती विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांनी दिली. आत्महत्यापूर्वी नाव घेतलेल्या चौघा पैकी संग्राम निकाळजे व वकील भावंडांनी २८ ऑगस्ट पर्यंत अंतरिम जमीन घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
तो मी नोव्हेचची भूमिका
ननावरे यांनी केलेल्या व्हायरल व्हिडीओ मधील संशयित आरोपी व माढाचे खासदार रणजितसिंग नाईक निंबालकर यांनी तो मी नव्हेचची भूमिका घेतली. माझ्या नावाचे एकट्या फलटण मध्ये ११ जण रणजितसिंग नाईक निंबाळकर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पोलीस कारवाईपूर्वी सखोल तपास करीत आहेत.