भिवंडी : मणिपूर येथील घटनेच्या निषेधार्थ भिवंडीत श्रमजीवी संघटनेच्या महिला पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली भर पावसात तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून सोमवारी निषेध करण्यात आला. मणिपूर घटनेसह सातारा येथील महिलेवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा देखील यावेळी निषेध करण्यात आला.यावेळी श्रमजीवी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष दत्तात्रयकोलेकर, जिल्हा महिला उपाध्यक्षा जया पारधी,संगिता भोमटे,तालुका अध्यक्ष सागर देसक, सुनिल लोणे,पदाधिकारी आशा भोईर, मोतीराम नामकुडा, तानाजी लहांगे, कविता कदम, प्रदीप चौधरी, नारायण जोशी, मुकेश भांगरे, जयेंद्र गावित यांसह महिला भगिनी सहभागी झाल्या होत्या.
यावेळी महिलांनी आपल्या तोंडावर काळया पट्या बांधून घटनेचा निषेध केला असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावे असलेले निवेदन तहसीलदार अधिक पाटील यांच्याकडे दिले. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हा शहराध्यक्ष स्वाती कांबळे यांनी देखील आपल्या कार्यकर्त्यांसह या घटनेचा निषेध नोंदवत प्रांताधिकारी अमित सानप यांच्याकडे लेखी निवेदन देत या घटनेचा निषेध केला.