शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

अतिधोकादायक इमारतींचे वीज, पाणी कनेक्शन पालिकेने तोडले; नौपाडा, कोपरी विभाग रडारवर

By अजित मांडके | Updated: June 15, 2024 17:04 IST

६७ इमारती रिकाम्या करण्याची मोहीम; शनिवार पासून जोरदार मोहीम.

अजित मांडके, ठाणे :ठाणे महापालिका क्षेत्रातील अतिधोकादायक इमारतींपैकी व्याप्त असलेल्या सर्व इमारतींचा पाणी पुरवठा, वीज जोडणी आणि मलनि:सारण वाहिन्या तत्काळ तोडण्यात याव्यात. असे आदेश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. त्यानुसार शनिवार पासून सर्वच प्रभाग समितीमधून उपायुक्तांसह सहाय्यक आयुक्तांच्या टीमने येथील अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्याबरोबरच ज्या इमारती व्याप्त आहेत, त्यांचे वीज, पाणी आणि ड्रेनेज कनेक्शन खंडीत करण्याची कारवाई सुरु केली. नौपाडा आणि कोपरीत सर्वाधिक अतिधोकादायक इमारती असल्याने सर्वात मोठा हातोडा याच भागात पडल्याचे दिसून आले.

ठाणे महापालिका आयुक्तांनी शुक्रवारी बैठक घेऊन पुढील दोन दिवसात सहाय्यक आयुक्तांनी त्यांच्या विभागातील अतिधोकादायक (सी वन) आणि धोकादायक (सी टू ए) अशा सर्व इमारतींची प्रत्यक्ष पाहणी करावी आणि रहिवाशांना तेथून स्थलांतरित होण्यासाठी संवाद साधावा, असेही निर्देश त्यांनी दिले होते. त्यानुसार शनिवारी नौपाडा आणि कोपरी भागात कारवाईला सुरवात झाली. नौपाडा आणि कोपरीत ६७ धोकादायक इमारती आहेत. त्यातील ३८ इमारती आता रिक्त करण्यात आल्या असल्याची माहिती उपायुक्त शंकर पाटोळे यांनी दिली. २७ इमारती रिकाम्या करुन त्यावर कारवाई करण्याचे प्रभाग समितीने निश्चित केले आहे. यात कोपरी येथील दौलत नगर भागातील १४ इमारतींचा समावेश आहे. शनिवारी या इमारतींच्या ठिकाणी जाऊन येथील रहिवाशांचे प्रबोधन करण्यात आले. तसेच इमारती रिक्त करण्याचे आवाहनही करण्यात आले. 

याशिवाय या इमारतींचे वीज, पाणी, ड्रेनेज लाईन कनेक्शन तोडण्यात आले असल्याचेही पाटोळे यांनी स्पष्ट केले. तसेच नौपाड्यातील १२ इमारतींचे देखील वीज, पाणी कनेक्शन खंडीत करण्यात आले आहे तसेच २ इमारतींवर तोडक कारवाई करण्यात आली आहे.  इतर प्रभाग समितीमध्ये देखील अशाच पध्दतीने कारवाई केली जात असल्याचे पालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले. महापालिका क्षेत्रात एकूण ९६ अतिधोकादायक इमारती (सी वन वर्गवारी) आहेत. त्यापैकी, ३७ इमारती व्याप्त आहेत. त्यात, नौपाडा आणि कोपरी - २७, माजिवडा - ०१, उथळसर - ०३, कळवा - ०२, मुंब्रा - ०४ अशा इमारतींचा समावेश आहे.

टॅग्स :thaneठाणेMuncipal Corporationनगर पालिकाWaterपाणीelectricityवीज