शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?
3
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
4
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
5
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
6
अदानींच्या झोळीत आली आणखी एक कंपनी; २०० कोटींना झाली डील, जाणून घ्या
7
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
8
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
9
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
10
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
11
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
12
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
13
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
14
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
15
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
16
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
17
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
18
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

'आव्हाडांनी वायकरांना शुभेच्छा द्याव्या'; प्रताप सरनाईक यांचा सल्ला

By अजित मांडके | Published: June 18, 2024 5:19 PM

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून रविंद्र वायकर हे विजयी झालेले आहेत.

अजित मांडके ,ठाणे : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून रविंद्र वायकर हे विजयी झालेले आहेत. त्यामुळे जितेंद्र आव्हाडांनी त्यावर बोलण्यापेक्षा वायकर यांना शुभेच्छा द्यायला हव्या, असा सल्ला शिवसेना शिंदे सेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली. 'जो जिता वो सिकंदर' आता त्यावर बोलून काही फायदा नसल्याचेही ते म्हणाले.ठाण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की एकदा पराभव झाल्यानंतर त्याबाबत पुन्हा मागणी करण्याचा अधिकार नाही.

शिवसेनेचा वर्धापन दिन हा वेगळा ठरणार असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे या मेळाव्यातील विचार ऐकण्यासाठी शिवसैनिकांमध्ये उत्साह असल्याचेही ते म्हणाले.  विधानसभेत जास्तीत जास्त जागा निवडून येतील यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. त्यासाठीच ही सभा महत्वाची असल्याचेही ते म्हणाले. दोन वर्षात सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यशस्वी झाले आहेत.  राज्यात लोकसभेला केवळ १५ जागा लढल्या आणि ७ जागा निवडून आणल्या. त्यामुळे राज्यात सगळ्यात अधिक स्त्राईक रेट असलेला पक्ष शिवसेना ठरला आहे. तर संजय राऊत सकाळी उठल्यानंतर काय बोलावे याचा विचार त्यांनी रात्रीच केलेला असतो अशी टीकाही त्यांनी केली. त्यातही बाळासाहेबांच्या शिष्याने काय करायचे ते लोकसभेच्या निवडणुकीत करुन दाखविले आहे. आमचा पक्ष किती मोठा आहे हे लोकसभेच्या निकालानंतर स्पष्ट झाले आहे. काही जणांनी बाळासाहेब यांचे मोडीत काढलेले विचार मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी पुन्हा लोकांसमोर आणले आहेत. त्यामुळे बाकी कोण काय बोलत त्यापेक्षा हे आपण मार्गक्रमण करत राहायचे असेही ते म्हणाले.

अजित पवार यांच्या विषयी त्यांनी छेडले असता,  या विषयावर आम्ही बोलणार नाही. आम्ही या विषयावर बोलणे अयोग्य आहे असे ते म्हणाले. सरनाईक यांना मंत्रीपद मिळणार का? असा सवाल त्यांना केला असता, सरनाईक यांचे नाव नेहमीच मंत्रीपदासाठी येत आहे. मात्र मुख्यमंत्री हा एक ठाणेकर याचा अभिमान असल्याचे ते म्हणाले. प्रत्येक वेळी विधानसभेचा एक सदस्य म्हणून आपले नाव मंत्रीपदासाठी चालते यावरच मी समाधानी असल्याचे ते म्हणाले.  त्यातही मंत्रीपद जर माझ्या नशिबात असेल तर ते कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही.

टॅग्स :thaneठाणेJitendra Awhadजितेंद्र आव्हाडpratap sarnaikप्रताप सरनाईक