शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

घोडबंदर रोडवरील वाहतुक कोंडी लवकरच फुटणार; गायमुख ते फाऊंट हॉटेल पर्यंत भुयारी मार्ग

By अजित मांडके | Published: July 06, 2024 4:17 PM

फाऊंटन हॉटेल जक्शन ते भाईंदर उन्नत मार्गाला मंजुरी.

अजित मांडके, ठाणे : घोडबंदर रोडवर होणारी वाहतुक कोंडी येत्या काळात सुटणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. २ जुलै रोजी एमएमआरडीए प्राधिकरणाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत गायमुख ते फाऊंटन हॉटेल जक्शन पर्यंत भुयारी मार्ग व फाऊंटन हॉटेल जक्शन ते भाईंदर उन्नत मार्ग या दोन्ही प्रकल्पांना मंजूरी देण्यात आली आहे.                   घोडबंदर रोडवरील गायमुख ते फाऊंटन हॉटेल जंक्शन या भागात चार पदरी मार्गिका असून या मागील ठाणे शहरातील घोडबंदर रस्त्याचा भाग व पुढील राष्ट्रीय महामागार्चा भाग विस्तृत रूंदीचे आहेत. त्यामुळे गायमुख ते फाऊंटन हॉटेल जंक्शन या भागात मोठ्या प्रमाणावर वाहतुककोंडी होते. तसेच या रस्त्याचा काही भाग घाट स्वरूपातील असून या भागात अवजड वाहनांची वाहतुक देखील मोठ्या प्रमाणावर होत असल्याने वाहतुकीची गती धीमी असते. या समस्येवर उपाय योजना करण्यासाठी या रस्त्याच्या भागाचे रूंदीकरण करणे आवश्यक आहे तथापि, रस्त्याच्या एका बाजुला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व दुसºया बाजुला ठाणे खाडी असल्याने रस्त्याचे रूंदीकरण करणे अश्यक्य आहे त्यामुळे गायमुख ते फाऊंटन हॉटेल जंक्शन या भागात भुयारी मार्ग होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे भाईंदर ते फाऊंटन हॉटेल जंक्शन या भागात देखील वाहतुककोंडी मोठ्या प्रमाणावर होत आहे. 

मुंबई महानगरपालिकेतर्फे वसोर्वा ते भाईंदर या प्रकल्पाचे काम सुरू असल्याने भाईंदर ते घोडबंदर रोडपर्यंत येण्याकरिता अंतर्गत रस्त्याचा वापर करण्यात येणार असून खाडी किनारा लगत असणारा खारफुटीचा भाग लक्षात घेता वाहतुककोंडीवर उपाय योजना करण्यासाठी भाईंदर ते फाऊंटन हॉटेल जंक्शन पर्यंत उन्नत मार्ग होणे गरजेचे आहे. ठाणे शहरातून घोडबंदर मार्गे वसई, विरार, मीरा रोड तसेच ठाणे ते भाईंदर येथे जाण्यासाठी नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतुककोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.

घोडबंदर रोडवरील वाहतुककोंडी दुर करण्यासाठी गायमुख ते फाऊंटन हॉटेल जंक्शन या भागात भुयारी मार्ग बांधण्यात यावा तसेच भाईंदर ते फाऊंटन हॉटेल जंक्शन पर्यंत उन्नत मागार्ची निर्मिती व्हावी यासाठी सरनाईक हे गेल्या ७-८ वर्षांपासून शासनाकडे पाठपुरावा करीत होते. त्यांच्या पाठपुराव्याला यश येऊन मंगळवारी झालेल्या एम.एम.आर.डी.ए.च्या बैठकीमध्ये वसई, फाऊंटन हॉटेल जंक्शन ते गायमुख या भागात भुयारी मार्ग बांधण्यासाठी तसेच गायमुख ते वसई भुयारी मागार्ने येणाऱ्या वाहनांना पुढे मीरा रोड, भाईंदरला अतिवेगाने जाता यावे यासाठी फाऊंटन हॉटेल जंक्शन, वसई ते भाईंदर पर्यंत उन्नत मागार्ची निर्मिती करण्यासाठी एम.एम.आर.डी.ए.चे महानगर आयुक्त संजय मुखर्जी यांनी मंजुरी दिली आहे.

गायमुख ते फाऊंटन हॉटेल जंक्शन या भुयारी मागार्साठी अंदाजे ११५०० कोटी रुपये व भाईंदर ते फाऊंटन हॉटेल जंक्शन या उन्नत मागार्साठी अंदाजे ८५०० कोटी असे दोन्ही प्रकल्पांना अंदाजे २० हजार कोटी खर्च अपेक्षित आहे. गायमुख ते फाऊंटन हॉटेल जंक्शन या भागात भुयारी मागार्ची निर्मिती करण्यात येणार असून गायमुख ते फाऊंटन हॉटेल या भागाची एकूण लांबी ५.५ किमी असून या अंतर्गत प्रत्येकी ३.५ किमी लांबीचे दोन स्वतंत्र बोगदे ३+३ असे सहा पदरी बांधण्यात येणार आहेत. तसेच भाईंदर ते फाऊंटन हॉटेल जंक्शन पर्यंतच्या रस्त्याची एकूण लांबी १० किमी असून ४+४ असे आठ पदरी उन्नत मागार्ची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात ठाण्यावरून वसई, विरार, मीरा रोड तसेच भाइर्दरकडे जाणाऱ्या प्रवाश्यांची वाहतूक कोंडीपासून सुटका होणार आहे.

टॅग्स :thaneठाणेTrafficवाहतूक कोंडी