ठाणे : शहरातील नौपाडा, गोखले रोड, विष्णुनगर, घंटाळी, ठाणे स्टेशन, महागिरी, जिल्हाधिकारी कार्यालय, उथलसर येथील परिसरातील ठाणेकरांच्या व शासकीय कार्यालयांच्या अखंडीत वीज पुरवठ्यासाठी संबंधित विकासकांकडून वीज पुरवठ्याच्याे वाढीव राेहित्रांसाठी जागा उपलब्ध करून देण्याची गरज महावितरणचे अतिरक्त कार्यकारी अभियंता राजेश मसणे यांनी पत्राव्दारे ठाणे महापालिका आयुक्तांसह ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे घातले आहे. सतत वीज पुरवठा खंडीत हाेत असलेल्या या परिसरांमध्ये जुन्या इमारतीचा पुनर्विकास होत आहे. नवीन बहुमंजिली इमारतीचे बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. इमारतीतीत उच्चभू रहिवाशी राहत असल्यामुळे विजेचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे महावितरण चे बहुतेक ट्रांसफॉर्मरवर माेठ्याप्रमाणात लाेड (अतिभारित) पडत आहे. त्यामुळे वीज पुरवठा खंडीत हाेत असल्याचे वास्तव नाैपाड्यातील जेष्ठ जागृक नागरिक महेंद्र माेने यांनी चव्हाट्यावर आणून महावितरणसह महापालिके पाठपुरावा केला. त्याची दखल घेऊन महावितरणने वस्तुस्थिती लक्षात आणून देत च्या २२/११ के वि सब स्टेशन साठी जागा मिळावी, यासाठी टीएमसीसह जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे.
इमारतीच्या बांधकामासाठीचे प्रस्ताव आल्यास रोहित्रासाठी विकासकांकडून जागा उपलब्ध करून घेण्याची गरज असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. नौपाडा, गोखले रोड, विष्णुनगर येथील नागरिकांना २२/११ केवी इटरनिटी व् रहेजा सब स्टेशन मधून वीजपुरवठा हाेता. तसेच घंटाळी, ठाणे स्टेशन, महागिरी, जिल्हाधिकारी कार्यालय, उथलसर परिसरातील नागरिकांना २२/११ केवी पावर हाउस सब स्टेशन मधून वीजपुरवठा सुरू आहे. याच विजेचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे महावितरण चे बहुतेक ट्रांसफॉर्मर अतिभारित झालेले आहे. या संबंधित सब स्टेशन मध्ये बिघाड झाल्यास सम्पूर्ण परिसर काळोखात जाताे. या परिसरातील इमारतीच्या बांधकामासाठीचे प्रस्ताव आल्यास रोहित्रासाठी जागा उपलब्ध करून घेण्याची गरज महावितरणचे अतिरक्त कार्यकारी अभियंता राजेश मसणे यांनी पत्राव्दारे उघड केले आहे.