ठाणे : नवी दिल्ली येथील राजीव गांधी स्टेडियम ,बवाना येथे चाैथी राष्ट्रीय लाठी चॅम्पियनशिप २०२४ ही स्पर्धा अलिकडेच पार पडली. लाठी नॅशनल फेडरेशन अंतर्गत ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेमध्ये भारतातील अनेक राज्यांनी सहभाग घेतला. त्यामध्ये ठाणे जिल्हा लाठी असोसिएशनच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन कयन उत्कृष्ठ कामगिरी केली. तब्बल सहा गाेल्ड व नऊ सिल्वर मेडल प्राप्त करून खेळाडूंनी दणदणीत विजय प्राप्त केला आहे.या सर्व विजेत्या खेळाडूंचे ठाणे जिल्हा असोसिएशनचे चेअरमन माणिक पाटील व पोलीस अधिकारी भरत चौधरी यांनी ठाणे येथे सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले. लाठी काठी खेळाचे प्रमुख प्रशिक्षक बाळा साठे व दिपाली साठे यांचेही यांचेही यावेळी कौतुक करण्यात आले या स्पर्धेच्या विजेत्यांमध्ये येथील सेंट लॉरेन्स स्कूलमधील पायल खैरकर, सिंघानिया स्कूलची धनश्री सोंडकर, सरस्वती स्कूल पाचपाखाडी भार्गव संकेत जोशी या तिघांनी प्रत्येकी दाेन गोल्ड मेडल प्राप्त केले आहेत.
याशिवाय सरस्वती स्कूल पाचपखाडीमधीील ओम गोपीनाथ राठोडने एक सिल्वर मेडल, तर सोहम खवणेकरने दोन सिल्वर मेडल प्राप्त केले. ताे सिंधुदुर्ग मिलिटरी स्कूलचा विद्यार्थी आहे. याप्रमाणेच संकल्प स्क्ूलमधील साहिल गोलेला, साई किंजाळकर आणि आदर्श इंग्लिश स्कूलमधील आशिष वाघमारे या तिघांनीही प्रत्येकी दाेन सिल्वर मेडल प्राप्त करून ही स्पर्धा जिंकली आहे.