उल्हासनगर : कॅम्प नं-४ परिसरातील श्रीरामनगर भागात पिसाळलेल्या एका कुत्र्याने १५ ते २० जणांना चावा घेतल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री घडला. अखेर आरोग्य विभागाने पिसाळलेल्या कुत्र्याला कल्याण महापालिका पथकाच्या साहाय्याने पकडल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला. तर दुसरीकडे महापालिकेचे कुत्र्याचे निर्बिजीकरणाने काम ठप्प पडले आहे.
उल्हासनगरात कुत्राने चावा घेतल्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. महापालिका आरोग्य विभागाने कुत्र्याचे निर्बिजीकरणांचा ठेका देण्यात आला. मात्र कुत्र्याचे निर्बिजीकरण करण्यापूर्वी त्यांना पकडून एका खोलीत ठेवण्यात येते. मात्र त्या केंद्राचे काम पूर्ण न झाल्याने, निर्बिजीकरण काम ठप्प पडले आहे. दरम्यान शुक्रवारी रात्री वाजण्याच्या सुमारास एका पिसाळलेल्या कुत्र्याने १५ ते २० जणांना चावा घेतल्याची घटना श्रीरामनगर परिसरात घडली. यामध्ये महापालिका सफाई कामगारांचा समावेश आहे. दहशत पसरविणाऱ्या पिसाळलेल्या कुत्र्याला पकडण्यासाठी महापालिकेने कल्याण महापालिका पथकाला बोलाविले. पथकाने रात्री उशिरा कुत्र्याला पकडल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
महापालिका अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर यांनी कुत्र्याचे लवकरच निर्बिजीकरण प्रक्रिया सुरू होणार असल्याचे सांगितले. कुत्र्याचा कोंडवाडा बांधण्याचे काम अंतिम टप्प्यात असून एका आठवड्यात निर्बिजीकरण प्रक्रिया सुरू झाल्यावर कुत्र्याचा त्रास कमी होणार असल्याचे जुईकर म्हणाल्या आहेत.