सदानंद नाईक, उल्हासनगर: शहरातील एसईएस शाळेतून १९७५ साली दहावी पास झालेले वर्गमित्र रविवारी मयूर हॉटेल येथे एकत्र आले. सर्वांनी शाळेच्या गोष्टीला उजाळा देऊन धमाल केली. उल्हासनगर कॅम्प नं-२ येथील एसईएस शाळेतून १९७५ साली दहावी पास झालेल्या वर्गमित्रांनी विविध क्षेत्रात प्रगती केली. कधीकाळी भेटल्यानंतर हाय हॅलो करणाऱ्या मित्रांना एकत्र आणण्यासाठी आ. आयलानी यांनी पुढाकार घेतला.
वर्ग मित्रांचे पत्ते शोधल्यानंतर त्यांना रविवारी रात्री मयूर हॉटेल मध्ये येण्याचे निमंत्रण देण्यात आले. तब्बल ५० वर्षानंतर ५५ ते ६० वर्ग मित्र एकत्र आल्यानंतर जुन्या गोष्टींना उजाडा देऊन धमाल केली. आयलानी हे १९७५ साली एसईएस शाळेतून एसएससी पास झाले. आयलानी यांनी नगरसेवक, उपमहापौर, महापौर, आमदार आदी महत्वाची पदे उपभोगली असून लोकसभा निवडणुकीत शहरातील प्रचाराची जबाबदारी त्यांच्यावर आहे. प्रसिद्ध उधोगपती अनु मनमानी, मुकेश किमतांनी, गोवा फ्रूडचे अमर बसतांनी आदी जण यावेळी एकत्र आले होते.
एसएससी पास झाल्यानंतर तब्बल ५० वर्षानंतर एकत्र आलेल्या मित्रांनी एकमेकांचे सुखदुःखांची विचारणा करून यापुढेही असेच एकत्र येण्याचे वचन दिले. बहुतांश मित्रांनी विविध क्षेत्रात आघाडीवर असून अनेकांचे मुले डॉक्टर, इंजिनिअर, सीए झाले आहेत. तर अनेक जण सरकारी नोकरी मध्ये आहेत. तसेच ज्यां मित्रांना मदतीची गरज आहे. त्यांना मदतीचा हात देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आल्याची माहिती आमदार आयलानी यांनी दिली. १९७५ साली दहावी पास झालेल्या मित्रा पैकी अनेकजण देवाला आवडल्याचेही आयलानी म्हणाले. ५० वर्षानंतर एकत्र आलेल्या मित्रांनी जुन्या आठवणीला उजाडा देऊन धमाल केल्यानंतर, जड मनाने पुन्हा भेटण्याचे आश्वासन देऊन एकमेकाला निरोप देण्यात आला.