सदानंद नाईक, उल्हासनगर : कॅम्प नं-२, गुरुनानकनगर येथे सनी सिंग लबाना रविवारी मध्यरात्री घरी जात होते. यावेळी तारसिंह दिलीपसिंह याने सनीसिंगने खाण्यासाठी गुटखा दिला नसल्याच्या रागातून पोटावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-२ येथील गुरुनानकनगर मध्ये राहणारा सनीसिंग लबाना रविवारी रात्री १ वाजता घरी जात होते. त्यावेळी मित्र असलेला तारासिंह दिलीपसिंह याने सनीकडे गुटख्याची मागणी केली. मात्र गुटखा दिला नसल्याच्या रागातून तारासिंह दिलीपसिंह याने सनी लबाना याच्या पोटावर चाकूने वार केले. यामध्ये सनी गंभीर जखमी झाला असून रुग्णालयात जखमी सनीवर उपचार सुरू आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तारासिंह दिलीपसिंह याला पोलिसांनी ताब्यात घेतले. अधिक तपास पोलीस करीत आहेत.