उल्हासनगर : विठ्ठलवाडी पोलिसांनी बुधवारी सायंकाळी ६ वाजता माणेरेगावातील गावठी दारूच्या अड्ड्यावर धाड टाकून गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त केला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून ३ लाख ४० हजाराची गावठी कच्ची दारूसह इतर साहित्य जप्त केले आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-४, माणेरेगाव येथील झाडाझुडुपांमध्ये गावठी दारूचा अड्डा सुरू असल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे विठ्ठलवाडी पोलिसांनी बुधवारी सायंकाळी ६ वाजता धाड टाकून गावठी दारूची हातभट्टी उद्ध्वस्त केली. हातभट्टी चालविणारा नितीन फुलोरे पळून जाण्यात याशवी झाला असून पोलिसांनी गावठी कच्ची दारूसह हातभट्टी दारू बनविण्याचे ३ लाख ४० हजार रुपये किमतीचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.