उल्हासनगर : राष्ट्रवादी पक्षाचे माजीं सभागृहनेते व प्रदेश सचिव भारत गंगोत्री यांना विश्वासात न घेता, त्यांच्या स्थानिक प्रभागात शनिवारी रात्री पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम कलानी यांनी ठेवला. यावरून गंगोत्री यांनी थेट पक्षनेते जितेंद्र आव्हाड व माजी खासदार आनंद परांजपे यांच्यावर टीकास्त्र सोडल्याने, पक्षातील वाद चव्हाट्यावर आला आहे.
गेल्या महापालिका निवडणुकीत कलानी परिवाराने सत्तेसाठी भाजप सोबत घरोबा केल्याने, पक्ष अस्तित्वावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले होते. अश्यावेळी भारत गंगोत्री टीमने राष्ट्रवादीचे ४ नगरसेवक निवडून आणून पक्षाचे अस्तित्व महापालिकेत कायम ठेवले. दरम्यान कलानी परिवाराने पुन्हा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. याप्रकारने शहरात कलानी व गंगोत्री असे दोन गट राष्ट्रवादीत पडले. शहरजिल्हाध्यक्ष पंचम कलानी यांनी गंगोत्री यांच्या प्रभागात शनिवारी पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम गंगोत्री यांना विश्वासात न घेता ठेवण्यात आला. असा आरोप गंगोत्री समर्थकांनी केला. तसेच भारत गंगोत्री यांनी प्रसिद्धपत्रक काढून पक्षनेते जितेंद्र आव्हाड व आनंद परांजपे यांच्यावर टीका केली. दोन्ही नेते जिल्हयात पक्ष मजबूत करण्या ऐवजी पक्ष कमकुवत करीत असल्याचा आरोप केल्याने, पक्षातील वाद चव्हाट्यावर आला आहे.
राष्ट्रवादीच्या पडती काळात शहरात पक्ष वाढविण्याचे काम गंगोत्री गटाने केले. मात्र त्यांनाच अप्रत्यक्षपणे पक्षाचा बाहेरचा रस्ता दाखवीत असल्याचा आरोप गंगोत्री गटाने केला. कलानी सत्तेसाठी पुन्हा भाजप सोबत हातमिळवणी करू शकतो. असा संशयही त्यांनी व्यक्त केला. गंगोत्री यांनी त्यांनी काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात आव्हाड व परांजपे यांच्यावर आरोप केल्याने, पक्ष प्रमुख काय कारवाई करतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले. गंगोत्री यांनी अन्य पक्षात प्रवेश केल्यास, शहर पूर्वेत राष्ट्रवादी कमकुवत होणार असल्याचे बोलले जात आहे. गंगोत्री यांच्यासह समर्थक पक्षप्रमुख शरद पवार यांची भेट घेऊन झालेला प्रकार कानावर घालणार आहेत. तर कलानी समर्थकांनी पक्ष वाढीसाठी शनिवारी पक्षप्रवेश कार्यक्रम ठेवल्याची माहिती दिली. शहरजिल्हाध्यक्ष पंचम कलानी, ओमी कलानी यांच्या सोबत संपर्क केला असता, झाला नाही.
याप्रकरणी शिवराज संजय पाटील (रा. संजोग कॉलनी, सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास सर्व संशयित तीन मोटारीतून पाटील यांच्या घरी गेले. तेथे ‘आम्ही एलसीबीचे लोक आहोत’ असे सांगून स्वाती संजय पाटील (वय ५८) यांना जबरस्तीने गाडीत घालून घेऊन गेले. तेथून संशयितांनी त्यांना मिरजेत नेले. तेथे नेऊन त्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगली शहर पोलिसांनी सर्व संशयितांना अटक करून न्यायालयात हजर केले असता, त्यांना ३० मेपर्यंत पोलिस कोठडी सुनाविण्यात आली आहे.