- सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरातील श्रीरामनगर परिसरात रात्रीला मुले घातक शस्त्र घेऊन फिरत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने, नागरिकांत भितीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले. व्हायरल व्हिडीओचा तपास पोलीस करीत असून त्यानंतर कारवाईचे संकेत विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिले.
उल्हासनगर कॅम्प नं-४ परिसरातील काही मुलांनी हातात पिस्टल घेऊन शिवीगाळ व धमकीचे व्हिडीओ काढून इन्स्त्राग्रामवर व्हायरल केल्याचा प्रकार गेल्या आठवड्यात घडला होता. याप्रकारने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. विठ्ठलवाडी पोलिसांनी असे व्हिडीओ इन्स्त्राग्रामवर व्हायरल करणाऱ्या १० जनावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली. तर त्यामधील अल्पवयीन मुलांची रवानगी भिवंडी बालसुधारगृहात केली. हे उदाहरण ताजे असतांना पुन्हा हातात घातक शस्त्र घेऊन रात्रीच्या वेळी काही मुले फिरत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रकाराने एकाच खळबळ उडाली असून नागरिक भितीचे छायेखाली आहेत. सदर व्हिडीओ कॅम्प नं-४ परिसरातील श्रीरामनगर मधील असल्याचे बोलले जात असून रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या एका रिक्षाचे टायर कडून नेत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे.
विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता सदर व्हिडीओ तपासला जाणार असून व्हिडीओ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्यास कारवाई अटळ असल्याचे संकेत त्यांनी दिले. कॅम्प नं-२ उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हातात तलवारी, चौपर, लोखंडी रॉड असे घातक शस्त्र हातात घेऊन अनेक घरांचे नुकसान केल्याचा प्रकार काही महिन्या पूर्वी घडला होता. महापालिका निवडणुकीचे वारे शहरात वाहत असून इच्छुक उमेदवार विविध उपक्रम राबवून आपल्या प्रचाराला सुरवात केली. असे राजकीय वातावरण असून विविध राजकीय पक्ष इच्छुक उमेदवारांच्या शोधत आहेत. अश्यावेळी तरुण घातक शस्त्र घेऊन रात्रीचे बिनधास्त फिरून नागरिकांत दहशत माजवीत असल्याची टीका होत आहे. अश्यावर कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे.