डोंबिवली - मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या ठाणे जिल्हा आगरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रगती महाविद्यालयाच्या स्वयंअर्थसाहाय्य विभागातर्फे उद्या, ६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता ‘इंडिया : अॅन इमर्जिंग ग्लोबल लीडर इन २१ सेंच्युरी’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक महाजन यांनी दिली.यंदाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत भारत जगाचे नेतृत्व करून जागतिक समाजकारण, अर्थकारण व राजकारणात आपला दबदबा निर्माण करून महासत्ता होण्याच्या दिशेने कशी वाटचाल करील, याबद्दल चर्चा करण्यात येणार आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेत भूतान, न्यू हेवन (यूएसए) येथून संशोधन पेपर सादर करण्यात येणार आहेत. या परिषदेत एकूण ७५ पेपर सादर करण्यात येणार आहेत. या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी भारत तसेच वेगवेगळ्या देशांतील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी स्वयंअर्थसाहाय्य विभागातील ‘बँकिंग अॅण्ड इन्शुरन्स’ या विभागातून ‘दी इंडिया इन ग्लोबल ऐरा’ या विषयावर ५, ‘मॉडीफाइड इंडिया’ या विषयावर ८, ‘इंडिया मॅनेजमेंट अॅण्ड एथिक्स’ या विषयावर १० असे संशोधन पेपर आले आहेत. या परिषदेत ‘ग्रे सोल्युशन्स फॉर हॉटेल’, ‘ग्लोबल इमेज आॅफ इंडिया’, ‘अ मेडिकल टुरिझम हब’ यासारख्या अनेक विषयांवर अंतर्गत चर्चा करण्यात येणार आहेत. बॅचलर आॅफ मॅनेजमेंट स्टडीज या विभागातून ‘ग्लोबल इम्पॅक्ट आॅन इंडियन ट्रेड’ या विषयावर ९०, टॅलेंट मॅनेजमेंट या विषयावर ५, रिटेल मॅनेजमेंट या विषयावर ५ असे संशोधनपर पेपर आले आहेत.या विभागामध्ये ‘रिक्रुटमेंट अॅण्ड मॅनेजमेंट’, ‘ह्युमन रिर्सोस मॅनेजमेंट’ यासारख्या विषयावर अंतर्गत चर्चा करण्यात येणार आहे. तसेच बॅचलर आॅफ सायन्स इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विभागातून ‘ई-कॉमर्स’ यावर ५, ‘आयसीटी अॅण्ड सायबर लॉ’ या विषयावर ४, ‘वायरलेस कम्युनिकेशन’ या विषयावर ५, ‘मोबाइल कॉम्प्युटिंग’ या विषयावर ५ आणि ‘डिजिटल ट्रान्झक्शन’ या विषयावर ५ असे संशोधनपर पेपर आले आहेत.च्या परिषदेचे उद्घाटन माजी मंत्री आणि ठाणे जिल्हा आगरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.च्या परिषदेस इंडोनेशिया येथील सुमानेरा उतारा या विद्यापीठातील अॅन्थ्रोपोलॉजी विभागाच्या डॉ. रीठा तंबुनन,तर मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. विष्णू मगरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.च्भूतान येथील रॉयल विद्यापीठाचे सहायक प्राध्यापक डॉ. गोपाळ तिवारी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत.च्तसेच देशविदेशांतील ११० संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थी सहभागी होणार आहेत.च्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने डोंबिवलीतील विद्यार्थ्यांना विचारवंत, तज्ज्ञांची मते ऐकायला मिळतील. यातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एक चांगली दिशा मिळेल असा आशावाद व्यक्त करण्यात आला.च्या परिषदेतून माहितीचे आदानप्रदान चांगल्या प्रकारे होईल असेही यावेळी सांगण्यात आले.
भारत आर्थिक महासत्ता होण्याबाबत परिषद, माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांच्या हस्ते होणार उद््घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 6:37 AM