ठाणे : नेहमीच कोणत्याही कार्यक्र माचे उद्घाटन पुढारी, मंत्री, खेळाडू किंवा एखाद्या समाजसेवकाच्या हातून केलं जातं; पण याला छेद देत जन्मठेपेची शिक्षा झालेला एक कैदी तो शिक्षा भोगत असताना उपक्र माचं उद्घाटन झाल्याचं कधी ऐकण्यात आलं तर...? हो, हे खरं आहे. हे घडलं आहे ठाणे सेंट्रल कारागृहात. ठाणे कारागृहामार्फत कैद्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या दिवाळी विक्र ी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी दिलीप पालांडे यांच्या हस्ते झाले. नागरिकांनी या मेळाव्याला उत्तम प्रतिसाद दिला. या माध्यमातून तब्बल दोन लाख रुपयांच्या विविध वस्तूंची विक्र ी झाली.
ठाणे मध्यवर्ती कारागृहामध्ये सुमारे साडेतीन हजारांच्यावर कैदी आहेत. विविध गुन्ह्यांत शिक्षा झालेल्या २00 कैद्यांना सुतारकाम, शिवणकाम, धोबीकाम, यंत्रमाग, बेकरी, फरसाण तयार करणे आदी कामांचे प्रशिक्षण दिलं गेलं आहे. त्यानंतर, त्यांना या कारागृहात असलेल्या विविध उद्योग, कारखान्यांत रोजगार दिला जातो. याकरिता त्यांचे कुशल, अर्धकुशल आणि अकुशल असे तीन गट करण्यात आलेले आहेत. कुशल गटातील कैद्यांना प्रतिदिन ५५ रु पये, अर्धकुशल ५0 आणि अकुशल गटातील कैद्यांना ४0 रुपये दिले जातात. एकंदरीत ज्या व्यक्तींनी पूर्वायुष्यात केलेल्या काही चुकांमुळे त्यांना न्यायालयाने शिक्षा दिली. त्यानंतर, या कारागृहात त्यांची रवानगी झाली. येथे येऊन त्यांनी विविध उद्योगांचे प्रशिक्षण घेतले. आता हेच कैदी शासनाला करोडो रु पयांचं उत्पन्न मिळवून देत आहेत. या कैद्यांनी तयार केलेल्या वस्तू ग्राहकांना उपलब्ध व्हाव्यात, याकरिता दिवाळी मेळावा कारागृह निर्मित वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्रीचे आयोजन केले जाते. त्याचे उद्घाटन यावर्षी २२ आॅक्टोबर रोजी झाले.या उद्घाटनाला कोणतीही व्हीआयपी व्यक्ती आली नव्हती. तर, या कार्यक्र माचे उद्घाटक होते जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले कैदी दिलीप पालांडे. त्यांच्या हस्ते या दिवाळी मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. दिलीप पालांडे यांना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. ते येथील खुल्या कारागृहात शिक्षा भोगतात. येथे चांगली वागणूक असणाऱ्या कैद्यालाच ठेवले जाते. मेळाव्यात खुर्च्या, चौरंग, देव्हारा, रु माल, रंगीत सुती टॉवेल, कॉटन शर्ट, लेडिज पर्स, बरमुडा, गव्हाच्या पिठापासून बनवलेली बिस्किटे आदी वस्तू विक्र ीसाठी उपलब्ध होत्या. यावेळी तुरु ंग अधीक्षक हर्षद अहिरराव म्हणाले की, शिक्षा भोगताना कैदीदेखील माणूस आहे. त्याला त्याच्या हातून घडलेल्या गुन्ह्याचा कालांतराने पश्चात्ताप होत असतो. त्यांच्याकडेही माणूस म्हणून बघणं गरजेचं आहे. पालांडे यांच्या चांगल्या वागणुकीपायीच त्यांना उद्घाटनाचा मान देण्यात आला, असे अहिरराव यांनी सांगितले.लाकडी वस्तूंना मोठी मागणीठाण्यातील मध्यवर्ती कारागृहात विविध गुन्ह्यांत २00 कैदी शिक्षा भोगत आहेत. त्यांनी कारागृहातील सहा उद्योग कारखान्यांत काम करून मागील तीन वर्षांत कोट्यवधी रु पयांचे उत्पन्न शासनाला मिळवून दिले आहे. विशेष म्हणजे येथे बनवल्या जाणाºया लाकडी वस्तूंना विशेष मागणी आहे.