अंबरनाथ : अंबरनाथ पश्चिम भागात विम्को कंपनीच्या शेजारी पालिकेच्या जुन्या शूटिंग रेंजला आधुनिक स्वरूप देण्यात आले आहे. पडीक अवस्थेत असलेल्या या शूटिंग रेंजला आता नवी झळाळी प्राप्त झाली आहे. तब्बल अडीच कोटींहून अधिक खर्च करून हे शूटिंग रेंज उभारले असून त्याचे उद्घाटन शिवसेना युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणात आहे.
अंबरनाथ शहरात विम्को कंपनीच्या शेजारीच पालिकेचे शूटिंग रेंज होते. मात्र, त्या ठिकाणी वापर बंद झाल्याने ही वास्तू नामशेष होण्याच्या मार्गावर होती. खा. श्रीकांत शिंदे यांनी या ठिकाणी अत्याधुनिक शूटिंग रेंज उभारण्याचे काम पालिकेमार्फत सुरू केले. सुरुवातीला या शूटिंग रेंजसाठी दीड कोटीची आर्थिक तरतूद करण्यात आली होती. मात्र, हा निधी कमी पडल्यावर इतर कामासाठी आणि अपुरी कामे पूर्ण करण्यासाठी आणखी एक कोटीच्या आसपास आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. सरासरी अडीच कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी सर्व सुविधायुक्त असे शूटिंग रेंज उभे करण्यात आले आहे. या शूटिंग रेंजच्या कामात नावीन्यता आणण्याचे काम पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. या शूटिंग रेंजमध्ये इनडोअर सभागृहात १० मीटर अंतराची रायफल शूटिंग रेंज उभारण्यात आले आहे. बाह्य भागात २५ मीटर आणि ५० मीटर असे दोन रेंज उभारण्यात आले आहेत. ५० मीटरच्या रेंजवर टार्गेट बदलण्यासाठी भुयारी कक्षही तयार करण्यात आला आहे. या शूटिंग रेंजचा वापर नवीन खेळाडू तयार करण्यासाठी करण्यात येणार असल्याचे खा. शिंदे यांनी स्पष्ट केले.शूटिंग रेंजच्या कामानिमित्त या परिसराचाही बदल करण्यात आला आहे. या शूटिंग रेंजच्या शेजारीच नेताजी मैदान असल्याने त्या ठिकाणी सुविधा पुरवण्याचे काम केले जात आहे. या भागातील खेळाडूंना त्याची मदत होणार आहे. शूटिंग रेंजच्या कामामध्ये राष्ट्रीय स्तरावरील मापदंड ठेवण्यात आला आहे. या ठिकाणी स्पर्धा भरवणे आणि शूटिंगचा सराव करण्यासाठी अनेकांना लाभ होणार आहे. या वास्तूचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात येणार आहे.शहा यांनी महाराष्ट्राच्या मल्लांच्या नादी लागूू नये - गुलाबराव पाटीलअंबरनाथ : अमित शहा यांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेनंतर शिवसेनेचे राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी शहा यांना चांगलाच सल्ला दिला आहे. शिवसेनेला ‘पटक देंगे’ म्हणणे सोपे आहे. मात्र, प्रत्यक्षात ते अवघड आहे. महाराष्ट्रातील पहिलवानांना जे डावपेच माहीत आहेत, ते इतरांना माहीत नाहीत. उगाच महाराष्टÑातील पहिलवानांच्या नादी लागू नका. पटक देण्याची भाषा त्यांनी गुजरातमध्ये वापरावी. महाराष्ट्रात त्यांना ते काम काही शक्य होणार नाही, अशी टीका पाटील यांनी केली.भास्करनगरमध्ये उभारली बहुउद्देशीय इमारतच्अंबरनाथमधील भास्करनगर या भागातील झोपडपट्टी भागात नागरिकांच्या सुविधांसाठी पालिकेने बहुउद्देशीय इमारत उभारली आहे. या भागातील पडीक अशा शौचालयाची इमारत तोडून त्या ठिकाणी नागरिकांच्या सोयीसाठी ही वास्तू उभारली आहे.च् या इमारतीत बाह्य रुग्णसेवा, व्यायामशाळा, अभ्यासिका, वाचनालय, योगा प्रशिक्षण केंद्र, संगणक प्रशिक्षण केंद्र असे अनेक उपक्रम राबवले आहेत. नगरसेवक राजेंद्र वाळेकर यांच्या संकल्पनेतून ही वास्तू साकारली असून त्या इमारतीला नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव देण्यात आले दिले आहे.