उल्हासनगर - आमदार कुमार आयलानी यांच्या निधीतील विविध कामाचे लोकार्पण व उदघाटन सोहळा केबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. गोलमैदान येथील कार्यक्रमात शहर विकास कामाला निधी कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन चव्हाण यांनी यावेळी दिले असून शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारीही उपस्थित होते.
उल्हासनगर शांतीनगर येथील स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी ५० लाखाच्या निधीतून सभागृह बांधण्यात आले. तर गोलमैदान येथे दिड कोटीच्या निधीतून योगाकेंद्र बांधण्यात आले. दोन्ही विकास कामाचे लोकार्पण गोलमैदान येथे केबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले.
यावेळी आमदार कुमार आयलानी, शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख राजेंद्र सिंग भुल्लर यांच्यासह शहर पदाधिकारी उपस्थित होते. तसेच रिजेन्सी अंटेलिया येथील उल्हास नदी किनाऱ्यावर साडे सहा कोटीच्या निधीतून विसर्जन घाट बांधण्याचे काम सुरू करण्यात येऊन त्याचे भूमिपूजन मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. गोलमैदान येथील कार्यक्रमात शहर विकासाला निधी कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन चव्हाण यांनी दिले.