मीरारोड - भाईंदर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक १ व २ वरील सरकता जिना आणि स्वच्छता गृहाचे लोकार्पण खासदार राजन विचारे यांच्या हस्ते शुक्रवारी रात्री करण्यात आले.
भाईंदर रेल्वे स्थानकाचा विकास व प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी खा . राजन विचारे यांनी रेल्वे प्रशासना कडे पाठपुरावा चालवला आहे. आता पर्यंत रेल्वे स्थानकात अनेक ५ सरकते जिने . लिफ्ट , पादचारी पूल, स्वच्छतागृह आदी सुविधा प्रवाश्याना उपलब्ध झाल्या आहेत.
शुक्रवारी रात्री खा . विचारे यांच्या हस्ते फलाट क्रमांक १ व २ वर बांधण्यात आलेल्या स्वच्छता गृहाचे तसेच बालाजी दक्षिण दिशेला बांधलेल्या नवीन पुलावर जाण्यासाठी सरकते जिन्याचे लोकार्पण करण्यात आले . यावेळी पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी राजेश शर्मा, अनिलकुमार गुप्ता, प्रदीप शर्मा, स्टेशन अधीक्षक भारती राजवीर , माजी नगरसेवक नीलम ढवण , रोहिदास पाटील , प्रवीण पाटील , ओमप्रकाश गाडोदिया , लक्ष्मण जंगम, जॉर्जी गोविंद, स्नेहल सावंत , पवन घरत , आकांक्षा वीरकर , धनेश पाटील, जयराम मेसे, जितेंद्र पाठक, चंद्रकांत मुद्रस आदींसह कार्यकर्ते , प्रवाशी उपस्थित होते .
सरकत्या जिन्यामुळे बालाजी नगर दिशेला उतरणाऱ्या प्रवाशांना जिने चढावे लागणार नाहीत. वृद्ध , महिला , रुग्ण आदींना दिलासा मिळाला आहे. शिवाय स्वच्छता गृह सुरु झाल्याने देखील प्रवाश्याना दिलासा मिळणार असून स्थानक बाहेर सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणे बंद होण्याची अपेक्षा आहे. बोरीवलीच्या धर्तीवर मीरारोड व भाईंदर रेल्वे स्थानकाची डेक लेव्हल वर फलाटाची निर्मिती होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मीरारोड स्थानकाचे काम सुरु झाले आहे असे खा. विचारे यांनी सांगितले . यावेळी महापालिके मार्फत सुरु भाईंदर पश्चिम येथील सुशोभिकरणाच्या कामाची तसेच प्रवाश्यां साठी तयार केलेल्या जिन्यांची पाहणी करण्यात आली . या सुशोभीकरणाच्या कामाचे लोकार्पण येत्या पंधरा दिवसात महापालिकेमार्फत होणार असल्याचे सांगण्यात आले.