- सचिन सागरेकल्याण - कल्याणमधील आधारवाडी कारागृहात सीसीटीव्ही प्रकल्प, स्मार्टकार्ड फोन सुविधा, ई मुलाखत युनिट, ई ग्रंथालय या नाविन्यपूर्ण सेवा सुरूकरण्यात आल्या आहेत. यामुळे कैद्यांच्या सुविधेत आणखी वाढ झाली आहे. अपर पोलीस महासंचालकव महानिरीक्षक कारागृह सुधारसेवा अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते आज या सर्व सुविधांचेउदघाटन करण्यात आले. यावेळी, कारागृह उपमहानिरीक्षक दक्षिण विभाग भायखळा योगेश देसाई आणि कारागृह अधीक्षक राजाराम भोसले उपस्थित होते.
स्मार्टकार्ड फोन सुविधेअंतर्गतआठवड्याला प्रत्येक कैद्याला तीन कॉल करता येणार आहे. ई मुलाखतीच्या माध्यमातून (व्हिसी)कैद्यांना महिन्यातून एक वेळा कुटुंबासोबत आणि एकवेळा वकिलासोबत बोलता येणार आहे. राज्यातीलजवळपास सर्व कारागृहांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ईग्रंथालयमुळे कैद्यांना जास्तीत जास्त पुस्तके वाचता येतील. सुरक्षेच्या दृष्टीने कारागृहामध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले. त्यामुळे अनुचित प्रकारांना आळा बसणार आहे.
पालघरला नवीन कारागृहाच्या कामाची सुरुवात झाली असून काम पूर्ण झाल्यानंतर ठाणे आणि आधारवाडी कारागृहाचा ताण कमी होईल असे सांगत कारागृहातील दुरवस्थेबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा सुरु असल्याचे गुप्ता यांनी यावेळी माध्यमांना सांगितले...