कल्याण : कल्याण ग्रामीण परिसरातील आडिवली-ढोकळी येथील नवीन चौकाच्या नामकरणचे उद्घाटन नुकतेच माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. आडिवली-ढोकळी येथील काकाचा ढाबा या भागाच्या चौकाच्या नामकरणाचा विषय अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. स्थानिकांच्या या मागणीकडे नगरसेवक पाटील यांनी लक्ष वेधले हाेते. या भागातील रहिवाशांनी बैठकीत या चौकाला श्रीरामनगरी व परशुराम चौक नामकरण करायचा ठराव करण्यात आला हाेता. पाटील यांच्या हस्ते चौकाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. या चौकाचे नामकरण व्हावे म्हणून नागरिक माझ्याकडे सातत्याने मागणी करीत होते. येथील स्थानिक रहिवासी नागरिकांची प्रत्यक्षात भेट घेऊन चर्चा केली हाेती. त्यानुसार आज माझ्या हस्ते या चौकाचे नामकरण झाले असल्याचे माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी सांगितले. चौकाच्या नामकरणाचा प्रलंबित विषय साेडविल्याबद्दल नागरिकांनी पाटील यांचे आभार मानले.
श्रीराम नगरी, परशुराम चौकाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2021 4:27 AM