ठाणे : ठाणे जिल्हा रु ग्णालयाच्या ८३ वर्षे जुन्या इमारतीचा पुनर्विकास करून तिथे अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी रु ग्णालय उभारण्यात येणार आहे. ५७४ खाटांच्या या रुग्णालयासाठी राज्य सरकारने ३१४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून त्याच्या संकल्पचित्राचे अनावरण बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे.त्याचबरोबर सिटी स्कॅन व डिजिटल एक्स रे सुविधांचे लोकार्पणही होणार आहे.
जिल्ह्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेता रु ग्णालयाची जागा अपुरी पडत असून अनेक अद्ययावत वैद्यकीय सुविधांच्या अभावी रु ग्णांची परवड होत असल्याने रु ग्णालय व परिसराचा पुनर्विकास करून सुपर स्पेशालिटी रु ग्णालय उभारण्याची मागणी पुढे आली. पालकमंत्री शिंदे यांनी सातत्याने आग्रह धरल्यामुळे राज्य शासनाने गेल्या वर्षी मार्च महिन्यात जिल्हा रु ग्णालयाच्या जागी सुपर स्पेशालिटी रु ग्णालयाला मंजुरी दिली. जानेवारीत शिंदे यांनी आरोग्य मंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर या प्रकल्पाला चालना मिळून फेब्रुवारीत स्थलांतरासाठी आणि जूनमध्ये सुपर स्पेशालिटीच्या बांधकामासाठी निधी मंजूर झाला. १४० खाटा या हृदयरोग, मेंदुविकार, कर्करोग, मूत्ररोग विकारांच्या सेवांसाठी असणार आहेत.पहिल्या टप्प्यात दोन इमारती : पहिल्या टप्प्यातरुग्णालयाच्या दोन सात मजली इमारती बांधल्या जाणार आहेत. एका इमारतीत अद्ययावत सामुग्रीसह जिल्हा रु ग्णालय, तर दुसऱ्या इमारतीत संदर्भ सेवा रु ग्णालयासह रु ग्णालयातील विविध तपासणी विभाग असणार आहेत.तिसºया इमारतीत असणार या सुविधातिसºया इमारतीत विविध प्रशासकीय विभाग,परिचर्या प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र, बहुउद्देशीय प्रशस्त सभागृह याच्यासह विविध रु ग्णालयीन विभागाच्या प्रशासकीय कामकाजाची दालने व निवासस्थाने प्रस्तावित आहेत. सुसज्ज नेत्ररोग विभाग असून यात अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त शस्त्रक्रि या गृह, लेसर उपचारपद्धती, रेटिना उपचारपद्धती आदी उपचारांचा समावेश आहे. अत्याधुनिक रक्तपेढी, अद्ययावत शस्त्रक्रि या गृह,ऑटोक्लेव्ह रूम,डायलिसिस विभाग,रु ग्णांच्या नातलगांसाठी निवासाची सोय,सर्व इमारतींसाठी सौर व्यवस्था,सेंट्रल आॅक्सिजन व सक्शन सिस्टिम,रेन वॉटर हार्वेस्टिंग,१०० शव ठेवण्याची सोय असलेले शवागृह आदी सुविधा असणार आहेत. मेंदूविकार व मेंदू शल्यचिकित्सा विभागामुळे रस्ते अपघातात डोक्याला मार बसलेल्या रु ग्णांवर तातडीने उपचार करणे शक्य होणार असून त्यामुळे या अपघातग्रस्तांचे जीव वाचवता येणार आहेत.सद्यस्थितीत ही सुविधा नसल्यामुळे अशा अपघातग्रस्तांना मुंबईला पाठवावे लागते, मात्र प्रवासात वेळ वाया जात असल्यामुळे तातडीने उपचार न मिळून अपघातग्रस्त दगावण्याचे प्रमाण मोठे आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयविकार आणि कर्करोगांचे प्रमाणही वाढत असून या दोन्ही आजारांवरील उपचारांची सोय या ठिकाणी होत असल्यामुळे गोरगरीबांना दिलासा मिळणार आहे.