ठाणे : अल्पवयीन मुलीला २४ तास घरकामासाठी राबविणारे व स्वत:च्या अधिकाराखाली पीडित मुलीचे मध्यवस्तीतले राहते घर तोडणारे व वादग्रस्त व्हिडीओ प्रकरणी चर्चेत असलेले ठाणे महापालिका आयुक्त संजीव जैस्वाल यांच्यावर त्वरीत कारवाई करावी आदी मागण्यांसाठी येथील सामाजिक कार्यकर्ते विक्रांत कर्णिक यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणालाा शुक्रवारी सकाळपासून प्रारंभ केला आहे. येथील शासकीय विश्रामगृहासमोर सुरू केले . ठाणे मतदाता जागरण अभियान, धर्मराज्य पक्ष आणि अनेक सामाजिक संघटनांनी या उपोषणाला संपूर्ण पाठींबा दिला आहे. स्वत:ला कर्तव्यकठोर, कार्यतत्पर म्हणवणारे ठाणे मनपा आयुक्तांनी घरकाम करणाऱ्या संबंधीत अल्पवयीन मुलीच्या मूलभूत हक्कांवर गदा आणल्याचा आरोप करीत बालमजुरी कायद्याअंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासह वादग्रस्त व्हिडीओ प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे.सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या वादग्रस्त क्लिपमध्ये आयुक्तांच्या बंगल्यावर काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीने तिथे चालणाऱ्या काही बाबी उघड केल्या आहेत, त्या मुलीचे झोपडे कारवाई करून पाडून टाकले आहे आणि आता ती मुलगी व तिचे कुटुंबीय बेपत्ता आहे, या चिंताजनक बाबीस अनुसरून कर्णिक यांनी उपोषणास प्रारंभ करीत त्वरीत चौकशीची मागणी लावून धरली आहे.
ठाणे महापालिका आयुक्तांच्या वादग्रस्त व्हिडीओ प्रकरणी त्वरीत कारवाई करण्यासाठी बेमुदत उपोषण
By सुरेश लोखंडे | Published: December 22, 2017 3:15 PM
वादग्रस्त व्हिडीओ प्रकरणी चर्चेत असलेले ठाणे महापालिका आयुक्त संजीव जैस्वाल यांच्यावर त्वरीत कारवाई करावी आदी मागण्यांसाठी येथील सामाजिक कार्यकर्ते विक्रांत कर्णिक यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणालाा शुक्रवारी सकाळपासून प्रारंभ
ठळक मुद्दे वादग्रस्त व्हिडीओ प्रकरणी चर्चेत असलेले ठाणे महापालिका आयुक्त संजीव जैस्वाल यांच्यावर त्वरीत कारवाई करावीबंगल्यावर काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीने तिथे चालणाऱ्या काही बाबी उघड केल्या त्या मुलीचे झोपडे कारवाई करून पाडून टाकले आहे आणि आता ती मुलगी व तिचे कुटुंबीय बेपत्ता