सदानंद नाईक, उल्हासनगर : संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याच्या घटना घडून मद्रासी पाड्यात काही जणांच्या घरात पाणी घुसले आहे. तर वालधुनी नदीने धोक्याची पातळी गाठली असून बिर्ला गेटसह अन्य ठिकाणी ३ झाडे पडले आहे.
उल्हासनगरात पहाटे पासून संततधार पाऊस सुरू असून कॅम्प नं-४ येथील मद्रासी पाड्यात नाल्याचे पाणी तुंबून काही घरात पाणी घुसले. महिलांनी अवैध बांधकामामुळे पाणी तुंबून घरात घुसल्याचा आरोप केला आहे. तर शांतीनगर, आयटीआय कॉलेज, गोलमैदान, गुलशननगर येथील राहुलनगर आदी सखल भागात पावसाचे पाणी तुंबले आहे. शहराच्या विविध भागात जुने तीन झाडे पडल्याची माहिती आपत्कालीन विभागाचे प्रमुख यशवंत सगळे यांनी दिली. तर शहराच्या मधोमध वाहणाऱ्या वालधुनी नदीने धोक्याची पातळी गाठली असून नदी किनाऱ्यावरील नागरिकांना महापालिकेने सतर्क राहण्याचे आवाहन केले. असाच पाऊस सुरू राहिल्यास नदी किनाऱ्यावरील घरात पाणी घुसण्याची शक्यता व्यक्त केले जात आहे.