ठाणे, दि. 24 - दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची घटना ठाण्यात घडली. याप्रकरणी नौपाडा आणि कासारवडवली पोलीस ठाण्यांमध्ये नोंद करण्यात आली आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावरील कालिकामाता मंदिरासमोरून जितेंद्रकुमार साहू हे त्यांच्या दुचाकीवरून ६ आॅगस्ट रोजी जात होते. ते भिवंडी ते मुलुंड या मार्गावरून जात असताना एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. यातच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी २३ आॅगस्ट रोजी त्यांचा भाऊ दीपककुमार साहू यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक अजय गंगावणे हे अधिक तपास करीत आहेत.दरम्यान, घोडबंदर बाजूकडून ठाण्याकडे जाणा-या मार्गावरून २३ आॅगस्ट रोजी पायी जाणारे रामचंद्र शिंगे (६२) यांना एका टँकरने गुरुवारी पहाटे १.४५ वा.च्या सुमारास धडक दिली. अपघातानंतर त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. कासारवडवली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एस.बी. पाटील अधिक तपास करीत आहेत. अपघात करणाºया टँकरचालकाचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.