उल्हासनगर : शहरातील रिजेन्सी अंटेलिया परिसरात राहणाऱ्या मोठ्या कंपनी भागीदारांच्या घरावर आयकर विभागाने गेल्या तीन दिवसांपासून धाडी मारल्या आहेत. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात रोकड मिळाल्याचे बोलले जात असून आयकर विभाग व कंपनी भागीदाराकडून याबाबत कोणतीच माहिती मिळू शकली नाही.
उल्हासनगरातील रिजेन्सी अंटेलिया गृहसंकुलात व आलिशान बंगल्यात मोठ्या कंपनीचे भागीदार वास्तव्यास आहेत. त्यातील ईगल, रिजेन्सी व कोणार्क कंपनीच्या भागीदारावर आयकर विभागाने धाडी टाकल्या असून गेले तीन दिवस आयकर विभागाचे अधिकारी झाडाझडती घेत असल्याचे चित्र आहे. त्यातील काही भागीदाराकडे मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्याची चर्चा शहरात रंगली आहे. याबाबत कंपनीच्या भागीदारा सोबत संपर्क केला असता झाला नाही. तर आयकर विभागाचे अधिकारी धाडी बाबत बोलण्यास तयार नाहीत. मात्र शहरात विविध चर्चेला उधाण आले आहे.
शहरातील रिजेन्सी-अंटेलिया गृहसंकुल व त्यातील बंगल्यात राहणाऱ्या मोठया कंपनीच्या भागीदारावर आयकर विभागाचे धाडसत्र सुरू असल्याने, शहरात विविध चर्चेला ऊत आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून धाडी सुरु आहे. त्यांची उल्हासनगरसह नवीमुंबई, कल्याण, डोंबिवली, मुंबई यासह राज्यात व देशात बांधकामसह रस्ते निर्माण, टोलनाके, उड्डाणपूल आदी क्षेत्रात हजारो कोटीचे विकास कामे सुरू आहेत.