ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे ३६४ रुग्ण बुधवारी आढळले आहेत. जिल्ह्यात आता दोन लाख ५६ हजार ५४९ वर गेली आहे. गेल्या तीन दिवसांपासून रुग्णसंख्या वाढू लागल्याने चिंतेत भर पडली आहे.
ठाणे शहर परिसरात ९९ रुग्ण आढळल्याने येथील रुग्णसंख्या आता ५९ हजार ७८८ झाली आहे. शहरात दोन मृत्यू झाल्यामुळे मृत्यूंची संख्या एक हजार ३६८ झाली. कल्याण-डोंबिवलीत १०२ रुग्णांची वाढ झाली असून, एक मृत्यू आहे. आता ६० हजार ८१४ रुग्ण बाधित असून, एक हजार १७९ मृत्युंची नोंंद आहे. नवी मुंबईमध्ये ८४ रुग्ण आढळले असून, दोन जण दगावले आहेत.
उल्हासनगरमध्ये सहा रुग्ण सापडले असून, एकही मृत्यू नाही. येथील बाधितांची संख्या ११ हजार ६८१ झाली, तर ३६८ मृतांची नोंद आहे. भिवंडीला एकही बाधित नसून एकही मृत्यू नाही. मीरा-भाईंदरमध्ये ३० रुग्ण आढळले असून, एक मृत्यू आहे. अंबरनाथमध्ये आठ रुग्ण आढळले असून, एकही मृत्यू नाही. बदलापूरमध्ये १८ रुग्णांची नोंद आहे. ग्रामीणमध्ये १७ रुग्णांची वाढ झाली असून, एक मृत्यू झाला आहे. आता बाधित १९ हजार २९३ आणि आतापर्यंत ५९० मृत्यू झाले आहेत.