ठाणे : जिल्ह्यातील महापालिकांसह गावपाड्यात गेल्या २४ तासांत मंगळवारी ३७१ कोरोना रुग्णांची वाढ झाली. तर ११ जणांचा मृत्यू झाल्याने आता मृतांची संख्या दहा हजार ७६६ झाली. आतापर्यंत रुग्णसंख्या पाच लाख ३५ हजार २६८ झाली आहे.
ठाणे शहरात ६० रुग्णांची वाढ होऊन दोन जणांचा मृत्यू झाला. शहरात आता एक लाख ३३ हजार ८८७ रुग्णांसह दोन हजार २५ मृतांची नोंद झाली. कल्याण-डोंबिवलीला ८८ रुग्णांची वाढ झाली असून एकाचा मृत्यू झाला. या शहरातील रुग्णसंख्या एक लाख ३६ हजार ९२३ झाली असून मृतांची संख्या आता दोन हजार ६०२ नोंदली गेली आहे.
उल्हासनरात दहा रुग्ण आढळले असून दोन मृत्यू झाला आहे. येथील मृतांची संख्या आता ५०२ झाली असून रुग्णसंख्या २० हजार ८३४ नोंद झाली आहे. भिवंडी शहरात पाच रुग्ण आढळले असून एक मृत्यू झाला. या शहरात १० हजार ७३५ रुग्णांसह ४६० मृतांची नोंद करण्यात आली. मीरा-भाईंदरलाही ३७ रुग्णांची वाढ असून एकही मृत्यू नाही. येथील रुग्णांची एकूण संख्या ५० हजार ८६५ झाली असून मृतांची संख्या एक हजार ३४२ नोंद झाली.
अंबरनाथ शहरात १३ रुग्ण वाढल्याने येथील रुग्णसंख्या आता १९ हजार ८०६ झाली असून मृत्यू नाही. येथील ५१७ मृतांची नोंद करण्यात आली. बदलापूरला १८ रुग्णांची वाढ होऊन एकही मृत्यू नाही. एकूण २१ हजार २२९ रुग्णसंख्या झाली असून ३४७ मृतांची नोंद झाली आहे. याप्रमाणेच ग्रामीण भागात ३३ रुग्ण आढळले असून दोन मृत्यू झाले आहेत. आता जिल्ह्यातील या गावपाड्यात ३९ हजार ६३५ रुग्णांसह एक हजार १९० मृतांची नोंद करण्यात आली.