ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे पाच हजार १३ रुग्ण रविवारी आढळले आहेत. जिल्ह्यातील रुग्ण संख्येत एक आठवड्यापासून एक हजार पेक्षा अधिक रुग्णांची घट झाली आहे. मात्र मृतांची संख्या वाढल्याने चिंतेत भर पडली. आजही जिल्ह्यात ४२ जणांचे निधन झाले आहे. जिल्ह्यात आता चार लाख १६ हजार ३८१ रुग्णांसह मृतांची संख्या सहा हजार ९४२ नोंदली आहे.
ठाणे शहरात एक हजार ५९३ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता एक लाख सहा हजार ३२४ झाली आहे. या शहरात पाच मृत्यू झाल्यामुळे मृत्यूची संख्या एक हजार ५५२ नोंद झाली. कल्याण - डोंबिवलीत एक हजार ४७५ रुग्णांची वाढ झाली असून पाच मृत्यू झाले आहेत. आता एक लाख सहा हजार ३३ बाधितांसह एक हजार ३२२ मृत्यूची नोंंद करण्यात आली आहे.
उल्हासनगरमध्ये १८० रुग्ण सापडले असून चार मृत्यू आहेत. येथील बाधितांची संख्या १७ हजार २७० झाली. तर, ३९८ मृतांची नोंद आहे. भिवंडीला ७१ बाधीत आढळून आले असून एकही मृत्यू नाही. आता बाधीत नऊ हजार १९० असून मृतांची संख्या ३७७ आहे. मीरा भाईंदरमध्ये ३३७ रुग्ण आढळले असून ११ मृत्यू झाले आहे. या शहरात बाधितांची संख्या ३७ हजार ५८१ असून मृतांची संख्या ९१६ आहे.
अंबरनाथमध्ये १२२ रुग्ण आढळले असून तीन मृत्यू झाले. येथे बाधीत १५ हजार २८२ असून मृत्यू ३४२ झाले आहेत. बदलापूरमध्ये २२७ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधीत १६ हजार २५२ झाले आहेत. या शहरातही तीन मृत्यू झाल्यामुळे मृत्यूची संख्या १३३ नोंद आहे. ग्रामीणमध्ये १८७ रुग्णांची वाढ असून तीन मृत्यू झाले. तर बाधीत २३ हजार ४०९ असून आतापर्यंत ६३४ मृत्यू नोंदले आहेत.