ठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या पाच हजार ९२ रुग्णांची वाढ शुक्रवारी झाली असून ५६ जण दगावले आहेत. जिल्ह्यात आता एकूण रुग्ण संख्या चार लाख ४१ हजार १८४ झाली असून सात हजार १८६ मृतांची नोंद करण्यात आली आहे. ठाणे शहरात आज तब्बल एक हजार १३७ रुग्ण सापडल्याने आतापर्यंत एक लाख १२ हजार ७६९ रुग्ण संख्या नोंदले गेली आहे. आज सात मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या एक हजार ५९५ झाली. कल्याण - डोंबिवलीला आज एक हजार ५४५ रुग्ण आढळून आले असून १२ मृत्यू आहे. या शहरात आता एक लाख १३ हजार १५१ बाधीत असून एक हजार ३६४ मृतांची नोंद आहे.
उल्हासनगरला १६७ रुग्ण आढळले असून चार मृत्यू झाले. या शहरात १८ हजार आठ बाधीत असून मृत्यू संख्या ४०६ नोंदली आहे. भिवंडीला ७२ रुग्ण सापडले असून तीन मृत्यू आहेत. येथे नऊ हजार ५३८ बाधितांची तर, ३८७ मृतांची नोंद केली. मीरा भाईंदरला ५४५ रुग्ण सापडले असून नऊ मृत्यू आहे. या शहरात आता ४० हजार ४३७ बाधितांसह ९६५ मृतांची संख्या आहे. अंबरनाथ शहरात ४८० रुग्ण सापडले आहे. तर, एकही मृत्यू नाही. या शहरात आता १६ हजार ६६० बाधितांसह मृतांची संख्या ३५१ आहे. बदलापूरला २१० रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे बाधीत रुग्ण १७ हजार ३५७ असून आठ मृत्यू असल्याने मृत्यूची संख्या १५७ झाली. जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात २६४ रुग्ण सापडले असून सहा मृत्यू आहे. या गांवपाड्यांत २४ हजार ६२७ बाधीत झाले असून मृत्यू ६५४ झाले आहेत.