ठाणे : जिल्ह्यातील रुग्णसंख्येत ६५६ रुग्णांची मंगळवारी वाढ झाली असून, ४० रुग्ण गेल्या २४ तासात दगावले. जिल्ह्यात आतापर्यंत पाच लाख ११ हजार ६६५ रुग्णांसह मृतांची संख्या आठ हजार ९६३ नोंदली आहे.
ठाणे मनपाच्या परिसरात १३१ रुग्ण आढळले. यासह येथील रुग्णसंख्या एक लाख २८ हजार १०० झाली. या शहरात पाच बाधित दगावल्याने मृतांची संख्या एक हजार ८६५ वर गेली आहे. कल्याण-डोंबिवली शहरात १०२ रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या एक लाख ३२ हजार सहा झाली. दिवसभरातील १६ मृतांमुळे आतापर्यंत एक हजार ५६९ मृत्यू नोंदविण्यात आले आहेत.
उल्हासनगरला ५२ रुग्णांच्या वाढीसह एकाचा मृत्यू झाला. आता येथील रुग्णसंख्या २० हजार १४५ झाली असून, ४६७ मृतांची नोंद झाली आहे. भिवंडीला दिवसभरात १४ रुग्ण सापडले असून, दोन मृत्यू झाले आहेत. येथील एकूण रुग्ण १० हजार ३९८ झाले असून, मृत्यू ४३४ नोंदले आहेत. मीरा-भाईंदरला ११३ रुग्णांसह सहा मृतांची वाढ झाली आहे. आता येथील रुग्णसंख्या ४८ हजार ३३६ झाली असून एक हजार २५६ मृतांची नोंद झाली आहे.
अंबरनाथला १४ रुग्णांची वाढ असून एकही मृत्यू नाही. येथील रुग्णसंख्या आता १९ हजार १५५ झाली असून ४०३ मृतांची नोंद झाली आहे. कुळगाव बदलापूरमध्ये २२ रुग्णांची भर पडली आहे. मात्र एकही मृत्यू नाही. आता येथील २० हजार ४१५ रुग्णांसह २४३ मृतांची नोंद करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या गांवपाड्यांमध्ये १०१ रुग्ण आढळले असून तीन जण दगावले. या परिसरात आतापर्यंत ३५ हजार ६३४ रुग्णांची वाढ होऊन ८५२ मृतांची नोंद करण्यात आली आहे.