शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
3
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
4
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
5
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
6
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
7
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
8
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
9
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
10
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
11
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
12
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
13
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
14
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
15
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
16
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
17
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
18
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न

ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या ७२० रुग्णांंची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2021 4:41 AM

ठाणे : जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाचे ७२० रुग्ण आढळले असून चार जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यात दोन लाख ६७ हजार ...

ठाणे : जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाचे ७२० रुग्ण आढळले असून चार जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यात दोन लाख ६७ हजार ६२० बाधितांची नोंद झाली. तर दिवसभरात चार रुग्णांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील मृतांची संख्या सहा हजार २९० झाली.

ठाणे शहरात १८३ रुग्ण आढळल्याने येथील रुग्णसंख्या आता ६३ हजार ७१ झाली. शहरात एकाचा मृत्यू झाल्यामुळे मृत्यूंची संख्या एक हजार ३९१ नोंदवली. कल्याण-डोंबिवलीत २४४ रुग्णांची वाढ झाली असून एकही मृत्यू नाही. आता ६३ हजार ९६६ रुग्ण बाधित असून एक हजार २०५ मृत्यूंची नोंंद झाली आहे.

उल्हासनगरला २० रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. येथील बाधितांची संख्या ११ हजार ९२६ झाली असून ३७२ मृतांची नोंद कायम आहे. भिवंडीला सात बाधित असून येथेही मृत्यू नाही. आता बाधित सहा हजार ८१३ असून मृतांची संख्या ३५५ कायम आहे. मीरा-भाईंदरमध्ये ७१ रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. या शहरात बाधितांची संख्या २७ हजार ३२७ असून मृतांची संख्या ८०४ कायम आहे. अंबरनाथमध्ये १९ रुग्ण आढळल्याने आता बाधित आठ हजार ८८९ असून एकही मृत्यू नाही. येथील मृत्युसंख्या ३१५ झाली आहेत. बदलापूरमध्ये २५ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधित १० हजार ४२ झाले आहेत. या शहरातही मृत्यू न झाल्याने मृत्यूंची संख्या १२७ कायम आहे. ग्रामीणमध्ये १२ रुग्णांची वाढ झाली असून दोन मृत्यू झाले. आता बाधित १९ हजार ६३९, तर आतापर्यंत ५९७ मृत्यू झाले आहेत.