ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे ९८४ रुग्ण मंगळवारी नव्याने सापडले आहेत. या रुग्णांसह जिल्ह्यात आता एक लाख आठ हजार ५३२ रुग्णसंख्या झाली आहे. मंगळवारी ३१ जणांचा मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यात तीन हजार १०७ मृतांची नोंद आतापर्यंत करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिली.यात ठाणे मनपाच्या कार्यक्षेत्रात १४४ नवे रुग्ण सापडले असून शहरातील बाधितांची संख्या २३ हजार ६३२ झाली आहे. कल्याण - डोंबिवली क्षेत्रात २०० रुग्ण नव्याने आढळून आले. तर आठ जणांचा मृत्यू झाला. आतानवी मुंबईला ३३३ रुग्णांची नोंद झाली असून चार रुग्ण दगावले आहेत. उल्हासनगरला २४ रुग्ण नव्याने आढळले आहेत. भिवंडी मनपा क्षेत्रात नऊ रुग्ण सापडले असून दोन मृत्यूंची नोंद झाली आहे. अंबरनाथला १८ रुग्ण नव्याने आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे. बदलापूरमध्ये ५६ रुग्ण वाढले. त्यामुळे बाधित रुग्ण तीन हजार ५४० झाले आहेत.>वसई-विरारमध्ये आठ कोरोना रुग्णांचा मृत्यूवसई-विरार शहरात मंगळवारी दिवसभरात आठ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, तर १५० नवे रुग्ण आढळले आहेत. त्याचवेळी २८० रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी महापालिका हद्दीतील एकूण बाधित रुग्णांची संख्या १४ हजार ८७९ वर पोहोचली आहे.त्यामुळे पालिका हद्दीतील एकूण मृतांची संख्या ३१३ वर पोहोचली आहे.रायगडमध्ये ३५९ नव्या रु ग्णांची नोंदरायगड जिल्ह्यात मंगळवार १८ आॅगस्ट रोजी ३५९ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रु ग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे बाधित रु ग्णांची संख्या ३१ हजार २६९ पोहोचली आहे. त्यापैकी १७ हजार ९१७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
ठाणे जिल्ह्यात ९८४ कोरोना रुग्णांची वाढ; मंगळवारी ३१ मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 4:40 AM