कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सेवेत बसची संख्या कमी असताना वर्षाला दोन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत होते. आता बसची संख्या वाढूनही उत्पन्नात घट झाली आहे. याप्रकरणी परिवहन व्यवस्थापक देवीदास टेकाळे यांच्यावर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी सदस्यांनी मंगळवारी झालेल्या परिवहन समितीच्या सभेत केली. सदस्यांच्या या रोषाला सभापती संजय पावशे यांनीही दुजोरा देत व्यवस्थापनाच्या त्रुटींवर बोट ठेवले.परिवहन शिवसेनेचे सदस्य संतोष चव्हाण यांनी, परिवहनच्या दैनंदिन उत्पन्नात घट होत आहे. त्यामुळे त्याला जबाबदार धरणाºया अधिकाºयांवर निलंबनाची कारवाई करावी, असा प्रस्ताव मांडला होता. त्यावर चर्चेदरम्यान चव्हाण म्हणाले, की २०१४ मध्ये परिवहनच्या ताफ्यात केवळ १०० साध्या बस व १० एसी बस होत्या. या बसद्वारे २०१४ मध्ये वर्षभरात परिवहनला २० कोटी रुपये उत्पन्न मिळाले. २०१५ मध्ये २४ कोटी रुपये उत्पन्न मिळाले. २०१६ मध्ये २२ कोटी रुपये उत्पन्न मिळाले. बस कमी असताना उत्पन्न जास्त मिळत होते. परिवहनच्या ताफ्यात सध्या २१८ बस आहेत. बसची संख्या वाढूनही परिवहनचे वार्षिक उत्पन्न घटले आहे. मार्च ते आक्टोबर २०१७ या सात महिन्यात ११ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. उर्वरित पाच महिन्यांत ११ कोटी उत्पन्न प्रवासी वाहतुकीतून मिळणे अपेक्षित नाही. कारण उत्पन्न घटत आहे. बस कमी होत्या, तेव्हा उत्पन्न जास्त आणि बस जास्त आल्या तेव्हा उत्पन्न घटले. परिवहनचे हे उलटे चक्र फिरण्यास जबाबदार असलेल्या अधिकाºयांना निलंबित करावे, अशी जोरदार मागणी चव्हाण यांनी केली. भाजपा सदस्य नितीन पाटील यांनीही त्यांच्या मागणीस पाठिंबा दिला. तसेच कारवाईची मागणी उचलून धरली.परिवहन व्यवस्थापनाने कोणाला विचारून बस फेºयांच्या वेळापत्रकात बदल केला, असा जाब सदस्यांनी प्रशासनाला विचारला. सदस्य प्रल्हाद म्हात्रे यांनी व्यवस्थापक टेकाळे यांच्यावरच प्रथम कारवाई करावी, अशी मागणी केली. सभापती पावशे यांनी सदस्यांचा राग योग्य आहे. प्रशासनाकडून कोणतीच कार्यवाही केली जात नाही.पावशे म्हणाले की, सकाळी ६ ते ८.३०, सकाळी ११ ते दुपारी १.३० आणि दुपारी चार ते रात्री ८.३० दरम्यान बस कमी असतात. डोंबिवली स्टेशन ते निवासी या बसला प्रवासी जास्त आहेत. तरीही पाऊण तास प्रवासी बसच्या प्रतीक्षेत ताटकळत उभे असतात. जुलै २०१६ पासून कल्याण-डोंबिवलीत ठाणे व नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बस जास्त प्रमाणात येत आहेत. त्यामुळे केडीएमटीचे उत्पन्न घटले आहे. रिक्षाचालक, खाजगी बस आणि अन्य परिवहन सेवेसाठी केडीएमटी व्यवस्थापनाने रान मोकळे सोडल्याचा आरोप सदस्यांनी या वेळी केला. फुकट प्रवास करणाºया प्रवाशांकडून दंड वसूल करण्याचे लक्ष्य एकाही तिकीट तपासणीसकाने पार पाडलेले नाही. त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी सदस्यांनी केली.चालक-वाहकांअभावी बस डेपोमध्येचकेडीएमटीचे व्यवस्थापक टेकाळे यांनी सांगितले की, नव्या दाखल झालेल्या बसवर चालक नसल्याने त्या रस्त्यावर येऊ शकत नाहीत. तसेच त्यांच्या देखभाल दुरुस्तीचे आणि चालक भरतीची निविदा काढली होती. तिला प्रतिसाद मिळत नसल्याने नव्या बस दाखल होऊनही उत्पन्न वाढलेले नाही.
बस वाढूनही उत्पन्न घटले, केडीएमटीची स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 6:12 AM