पंकज पाटील, अंबरनाथ:अंबरनाथच्या भाजी मार्केट परिसरात गुरुवारी रात्री दोन पिसाळलेल्या कुत्र्याने अनेक नागरिकांना चावा घेतला होता. सुरुवातीला हा आकडा पंचवीसच्या घरात होता. मात्र शनिवारी डॉक्टर ने दिलेल्या माहितीनुसार भाजी मार्केट परिसरात तब्बल 52 जणांना कुत्र्याने चावा घेतल्याचे उघड झाले आहे. या घटनेनंतर दोन पैकी एका कुत्र्याला पालिकेने पकडले असून दुसऱ्या कुत्र्याचा शोध घेण्यात येत आहे.
अंबरनाथचा भाजी मार्केट परिसर हा नेहमीच नागरिकांनी गजबजलेला असतो. अशा भाजी मार्केट परिसरात दोघा पिसाळलेल्या कुत्र्यांनी गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी सकाळी तब्बल 52 जणांना चावा घेतल्याचे उघड झाले आहे. या 52 रुग्णांवर छाया रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. अवघ्या 24 तासात तब्बल 52 जवानांना चावा घेतल्याने या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली होती. ही तक्रार पालिकेकडे प्राप्त होतात त्या दोन कुत्र्यांपैकी एका कुत्र्याला पकडण्यात पालिकेच्या श्वान पथकाला यश आले आहे. मात्र दुसरा कुत्रा अजूनही मोकाट असल्याने काहीशी भीतीचे वातावरण भाजी मार्केट परिसरात पसरले आहे.