शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
3
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
4
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
5
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
7
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
8
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
9
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
10
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
11
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
12
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
13
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
14
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
15
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
16
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
17
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
18
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
19
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
20
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा

ठाणे जिल्ह्यात कोरानाच्या एक हजार ४२८ रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 4:41 AM

लोकमत न्यूज नेटकर्क ठाणे : जिल्ह्यातील महापालिकांसह ग्रामीण गावपाड्यात मंगळवारी १४२८ कोरोना रुग्णांची वाढ झाली असून, ६५ जणांचा मृत्यू ...

लोकमत न्यूज नेटकर्क

ठाणे : जिल्ह्यातील महापालिकांसह ग्रामीण गावपाड्यात मंगळवारी १४२८ कोरोना रुग्णांची वाढ झाली असून, ६५ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत रुग्णसंख्या ४ लाख ९१ हजार ८१७ झाली असून, जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ८१७३ झाली आहे.

ठाणे शहरात २९० रुग्णांची वाढ होऊन आठ जणांचा मृत्यू झाला. या शहरात एकूण १ लाख २४ हजार ८०१ रुग्णांसह १७६६ मृतांची नोंद झाली. कल्याण-डोंबिवलीत ४१५ रुग्णांची वाढ, तर २० मृत्यू झाले आहेत. या शहरातील रुग्णसंख्या १ लाख २७ हजार २४९ झाली असून, मृतांची संख्या आता १५८४ नोंदली आहे.

उल्हासनगरात ६९ रुग्ण आढळले असून, तीन मृत्यू झाले. येथील मृतांची संख्या आता ४५० झाली असून, रुग्णसंख्या १९ हजार ५२४ नोंद झाली. भिवंडी शहरात २४ रुग्ण आढळले असून, एक मृत्यू झाला आहे. या शहरात १० हजार ११७ रुग्णांसह ४०५ मृतांची नोंद झाली. मीरा-भाईंदरला ११९ रुग्णांच्या वाढीसह ११ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. येथील रुग्णांची एकूण संख्या ४६ हजार २९० झाली असून, मृतांची संख्या ११३६ नोंद झाली.

अंबरनाथला ४३ रुग्ण वाढल्याने येथील रुग्णसंख्या आता १८ हजार ५८४ झाली, तर ३९४ मृतांची नोंद करण्यात आली. बदलापूरला ५६ रुग्णांची वाढ होऊन आठ मृत्यू झाले. याप्रमाणेच ग्रामीण भागात २३५ रुग्ण आढळले असून, आठ मृत्यू झाले. आता जिल्ह्यातील या गावपाड्यात ३० हजार ११० रुग्णांसह ७५४ मृतांची नोंद करण्यात आली.