भिवंडी : पॅरोलवर घरी आलेल्या एमआयएम भिवंडी शहराध्यक्ष खालिद गुड्डू याच्याविरोधात एका ३७ वर्षीय महिलेने बलात्काराची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल केल्याने पोलिसांनी शनिवारी खालिद गुड्डू यास पुन्हा ताब्यात घेत अटक केली. न्यायालयाने सुनावलेली पाेलीस काेठडी सोमवारी संपत असल्याने त्याला न्यायालयात हजर केले असता त्याच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ आली आहे.
दरम्यान, शनिवारी गुड्डू यास अटक केल्यानंतर संतप्त समर्थकांनी पोलीस उपायुक्त कार्यालयाबाहेर माेठ्या प्रमाणात एकत्र येत गोंधळ घातला हाेता. याप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी शासकीय कामात अडथळा व कोविडसंदर्भात लागू निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या सात जणांना अटक केली हाेती. भिवंडी न्यायालयात त्यांना हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली, तर खालिद गुड्डू याचे भाऊ माजी नगरसेवक राजू शेख आणि एमआयएम पक्षाचे शहर सरचिटणीस ॲड. अमोल कांबळे यांचा पोलीस शोध घेत आहेत. जमावाला चिथावणी देणाऱ्यांविरोधात पोलीस कारवाई करणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.