शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News Live:रतन टाटांची अंत्ययात्रा ४ वाजता; वरळी येथील स्मशानभूमीत पार्थिवावर होणार अंत्यसंस्कार
2
भारत बनवणार अण्वस्त्रांनी सुसज्ज दोन पाणबुड्या! केंद्राची ४० हजार कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी
3
Ratan Tata Death News : "मी गेल्यानंतरही कंपनी सुरू ठेवा"; रतन टाटांनी केली होती सूचना, पुण्यातील 'त्या' प्लांटमध्ये आजही काम सुरूच
4
Ratan Tata : रतन टाटांना मरणोत्तर 'भारतरत्न' मिळणार? राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर
5
चलो भगवान भक्तीगड! धनंजय मुंडे पहिल्यांदाच बहीण पंकजासोबत सावरगाव घाटला जाणार
6
हरयाणात भाजप दलित नेत्याला उपमुख्यमंत्री करणार का? राजकीय चर्चांना उधाण
7
चिडलेल्या स्थितीत दुकानाबाहेर पायऱ्यांवरच का बसून राहिली IAS अधिकारी टीना डाबी?
8
टाटा, गोदरेज, भाभा! इराण या बड्या हस्तींना मुकला...; पारशी समाज भारतात आलाच नसता तर... 
9
'तुम्हाला भेटायचं राहूनच गेलं..'; रतन टाटांवर धर्मेंद्र यांची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट
10
रुबिना दिलैकने केला रॅम्प वॉक, पडता पडता वाचली; नंतर अभिनेत्रीच्या 'त्या' कृतीचं होतंय कौतुक
11
रतन टाटांनी मान्य केली होती नॅनोतील 'ती' चूक; ट्रकमधून बंगालवरुन गुजरातला हलवला प्रकल्प
12
पैसाच पैसा! घरात सर्वत्र नोटांचे बंडल; नवऱ्यानेच केला लाचखोर इंजिनिअर बायकोचा पर्दाफाश
13
"माझा क्रिकेटशी काहीही संबंध नाही"; असं का म्हणाले होते Ratan Tata?
14
अमेरिकेनं इस्रायलला एक वर्षात दिले 18,47,15,19,00,000 रुपयांचे शस्त्रास्त्र! लिस्ट बघून धक्का बसेल, डोकं गरगरेल
15
PAK vs ENG : WHAT A MATCH! सपाट खेळपट्टीवर पाकिस्तान 'भुईसपाट', इंग्लंडकडून बेक्कार धुलाई
16
"केवळ जिवंत असतानाच नव्हे, तर मत्यूनंतरही..."; सचिन तेंडुलकरची टाटांना भावपूर्ण आदरांजली
17
महायुतीत कुरघोडी! शिंदे गटाच्या आमदाराचं थेट छगन भुजबळांना चॅलेंज; समोर या, मग...
18
लाईव्ह शोमध्ये रतन टाटांच्या निधनाची बातमी कळताच दिलजीतच्या 'या' कृतीचं होतंय नेटकऱ्यांकडून कौतुक
19
Kareena Kapoor : "पुरुषांचं वर्चस्व असलेल्या इंडस्ट्रीत टिकून राहणं कठीण"; करीना कपूरने सांगितला अनुभव
20
चाहत्यांच्या गर्दीत सूरज चव्हाणची तब्येत बिघडली; अंकिता म्हणते, 'त्याला सांभाळायची गरज...'

वाढवण बंदरविरोधी एकजूट दाखवणार; अनेक गावांत रविवारी पार पडल्या बैठका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2020 12:44 AM

१५ डिसेंबर रोजी किनारपट्टी बंदचे आवाहन

- हितेन नाईकपालघर : वाढवण बंदराला फक्त वाढवण व आजूबाजूच्या ३-४ गावांचाच विरोध आहे, असे यंत्रणांना भासवून किनारपट्टीवरील इतर गावांत बंदरातील कामांच्या ठेक्यासह अन्य आमिषे देणाऱ्यांना आपल्या एकजुटीची ताकद दाखविण्यासाठी मुंबईच्या कफ परेड ते झाई-बोर्डी दरम्यानची किनारपट्टी सज्ज झाली आहे. मंगळवारी १५ डिसेंबर रोजी किनारपट्टीवरील सर्व गावांनी बंद ठेवून बंदरविरोधी एकजुटीची ताकद शासनाला दाखवून देण्यासाठी अनेक गावांनी रविवारी बैठकांचे आयोजन केले होते.कोणत्याही परिस्थितीत वाढवण बंदर होणारच, अशा अफवा पसरवून वाढवण बंदराविरोधातील वाढत चाललेल्या ताकदीला तोडण्याचे काम काही आपल्यातलेच समाजद्रोही करीत असल्याचा कट आता स्थानिकांच्या लक्षात आला असून लोकशाही मार्गाने एकजुटीचा लढा उभारून हे बंदर कायमस्वरूपी हद्दपार करण्याचा विडा उचलण्यात आला आहे. त्याचे एक पाऊल म्हणून १५ डिसेंबर रोजी किनारपट्टी बंदचे आवाहन करण्यात आले आहे. हा बंद यशस्वी व्हावा यासाठी चिंचणी ते झाई, मुरबे ते तारापूर, सातपाटी ते दातीवरे, अर्नाळा ते उत्तन, गोराई-वर्सोवा-कफ परेड अशा भागासाठी टीम बनवून लोकांमध्ये फिरून बंदमधील सहभाग नोंदविण्याबाबत जनजागृती सुरू असल्याचे कृती समितीचे कार्याध्यक्ष रामकृष्ण तांडेल यांनी सांगितले.विविध संघटनांचे बळआपल्या एकजुटीची ताकद अभेद्य असल्याचे जगाला दाखवून देण्याची संधी १५ डिसेंबरच्या निमित्ताने मिळालेली असून वाढवण बंदरविरोधी संघर्ष समिती, नॅशनल फिश वर्कर्स फोरम, महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, ठाणे जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती संघ, अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, आदिवासी एकता परिषद, कष्टकरी संघटना, ठाणे जिल्हा मच्छीमार समाज संघ आदी संघटनांचे बळ मिळणार असल्याचे नॅशनल फिश वर्कर्सचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.‘बंदर गुजरातमध्ये नेऊन दुपटीने विकास साधा’; स्थानिकांमध्ये संताप, संघर्षाचा निर्धारपालघर : गुजरात राज्याच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या भाजपच्या केंद्र सरकारने मुंबईतील आयएफएससी केंद्र, पालघर जिल्ह्यातील सफाळेजवळील प्रशिक्षण केंद्र आदी विकासाला पोषक ठरणाऱ्या बाबी गुजरातमध्ये नेल्या. त्याच धर्तीवर केंद्र सरकारने वाढवण बंदरही गुजरातमध्ये नेऊन आपला दुपटीने विकास साधावा, असे आता स्थानिक ठणकावून सांगू लागले आहेत.‘शेवटपर्यंत संघर्ष करेन, एक वेळ मृत्यू पत्करेन, पण इथल्या वाढवणच्या भूमीवर एक फावडेही मारू देणार नाही,’ असा एल्गार इथल्या तरुण, वृद्ध, महिला, लहान मुलांनी एकत्र येत जाहीर केला आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेली आमची फसवणूक आता आमच्या लक्षात आली असून पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्हाला हा लढा लढायचा असल्याचे वाढवणविरोधी लढ्यातून तरुणांनी दाखवून दिले आहे. लोकांची एकजूट दिवसेंदिवस वाढत असताना ही ताकद फोडण्याचे काम काही स्थानिक गद्दार पैशासाठी करू पाहत असल्याने अशा गद्दारांना वेळीच ठेचण्यासाठी वाढवणविरोधी तरुण आता पेटून उठला असल्याचे दिसून येत आहे.देशाला अणुऊर्जेमध्ये सशक्त बनविण्याच्या नावाखाली पोफरण-अक्करपट्टीवासीयांच्या घरांवर नांगर फिरवून त्यांना ज्या नरकयातना भोगायला लावल्या ते पाहता आज स्थानिकांना सरकारवर आणि त्यांच्या लोकप्रतिनिधींवर फारसा विश्वास राहिलेला नाही. आजही ज्यांच्या घरांवर नांगर फिरवून उभ्या राहिलेल्या ३ आणि ४ अणुऊर्जा प्रकल्पांत साध्या कंत्राट पद्धतीनेही नोकऱ्या स्थानिकांना मिळत नाहीत, त्यांना नोकऱ्या मिळविण्यासाठी झगडावे लागत असून त्यांच्या मतावर निवडून आलेले लोकप्रतिनिधी त्यांना नोकऱ्या मिळवून देण्यात अपयशी ठरले आहेत. उलट प्रकल्पग्रस्त म्हणून आपल्या हक्काच्या, अधिकाराच्या नोकरीसाठी रस्त्यावर उतरणाऱ्या स्थानिकांना पोलीस कारवाईला सामोरे जावे लागत आहे. विश्वास टिकवावा मच्छीमार, शेतकरी, बागायतदार, डायमेकर आदींचा आतापर्यंत राजकीय पक्षांनी फक्त व्होट बँक म्हणून वापर केल्याने त्यांचे प्रश्न, समस्या आजही जैसे थे आहेत. मात्र जिल्ह्यातील खासदार आणि सर्व आमदारांनी वाढवण बंदराला विरोध दर्शविल्याने लोकांमध्ये समाधान असून हा विश्वास टिकवून ठेवण्याची लोकप्रतिनिधींपुढे संधी असल्याचे सांगितले जाते.