- निलेश धोपेश्वरकर ठाणे : भारतात ५० वर्षांत आत्महत्यांचे प्रमाण ४०० टक्क्यांनी वाढले आहे. हे अत्यंत चिंताजनक असल्याचे मत वास्तव फाउंडेशनचे अध्यक्ष अमित देशपांडे आणि त्यांच्या सहकारी प्रियंका सिद्धेश्वर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये महिलांपेक्षा पुरुषांचे प्रमाण अधिक आहे. त्यातही विवाहित पुरुषांच्या आत्महत्यांचे प्रमाण ६८ टक्के आहे. पण, याबाबत कुणीच बोलत नाही. सरकारही वास्तव मांडत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.सध्याच्या आधुनिक युगात जीवनमान उंचावण्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. मात्र, हे करत असतानाच अनेक अडचणी, समस्यांना सामोरे जावे लागते. त्यातूनच, नैराश्य येते आणि ती व्यक्ती आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलते. जर या आत्महत्या रोखायच्या असतील, तर सरकारने प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी हेल्पलाइन सुरू केली पाहिजे, जेणेकरून आपले ऐकणारे कुणीतरी आहे, ही भावना निर्माण होईल, असे त्यांनी सांगितले.दि. १० सप्टेंबर हा ‘जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन’ म्हणून पाळला जातो. यानिमित्ताने देशपांडे आणि सिद्धेश्वर यांनी पुरुषांच्या आत्महत्यांबाबत संशोधनात्मक पेपर सादर केला. यात त्यांनी १९६४ ते २०१३ या ५० वर्षांतील आत्महत्यांच्या घटनांचा आढावा घेतला आहे. त्यातून, त्यांनी काही निरीक्षणे नोंदवली आहेत. आत्महत्या करणाºया पुरुषांमध्ये अभियंते, डॉक्टर, मॅनेजर अशी उच्चशिक्षित मंडळी असल्याकडे या दोघांनी लक्ष वेधले.१९६४ मध्ये एकूण आत्महत्या करणाºयांची संख्या ३३ हजार ६२५ होती. ती वाढून २०१३ मध्ये एक लाख ३४ हजार ७९९ झाली. एक लाख लोकसंख्येमागे आत्महत्या करणाºयांचे प्रमाण ७.१ वरून ११ इतके झाले. २०१० या वर्षात हे प्रमाण ११.४ इतके झाल्याचे ते म्हणाले. मागील दोन वर्षांत महिलांमधील आत्महत्यांचे प्रमाण कमी झालेले असतानाच पुरुषांच्या आत्महत्यांच्या प्रमाणात सातत्याने वाढ झाली आहे. महिलांनी आत्महत्या केलेल्यांमध्ये गृहिणींचे प्रमाण अधिक असल्याचे या दोघांनी सांगितले.सन २०११ मध्ये देशात सर्वाधिक आत्महत्यांच्या घटना घडल्या. त्यावर्षी एक लाख ३५ हजार ५८५ जणांनी आत्महत्या केल्या. तर, २०१३ मध्ये एकूण आत्महत्या करणाºयांची संख्या कमी होऊन एक लाख ३४ हजार ७९९ इतकी झाली. पण, पुरुषांच्या आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली. २०११ मध्ये ८७ हजार ८३९ पुरुषांनी आत्महत्या केल्या, तर २०१३ मध्ये ९० हजार ५४३ पुरुषांनी आत्महत्या केल्या. दुसºया बाजूला महिलांच्या आत्महत्यांचे प्रमाण कमी झाल्याची समाधानकारक बाब दिसून आली. २०११ मध्ये ४७ हजार ७४६ महिलांनी आत्महत्या केल्या. हे प्रमाण २०१३ मध्ये ९.५ टक्क्यांनी कमी होऊन आत्महत्या करणाºया महिलांची संख्या ४४ हजार २५६ इतकी झाली. विवाहितांच्या आत्महत्यांमध्येही घट झाली आहे. २०११ मध्ये ३२ हजार ५८२ विवाहित महिलांनी आत्महत्या केल्या होत्या, तर २०१३ मध्ये २९ हजार ४९१ महिलांनी आत्महत्या केल्या. त्याचवेळी २०१३ मध्ये ६४ हजार ९८ विवाहित पुरुषांनी आत्महत्या केल्याचे या दोघांनी नमूद केले.>कौटुंबिक वाद, आजारपण ही प्रमुख कारणेपुरुषांच्या आत्महत्यांमागे प्रामुख्याने कौटुंबिक वाद आणि आजारपण ही प्रमुख कारणे आहेत. कौटुंबिक अडचणींमुळेपुरुषांनी आत्महत्या केल्याचे देशपांडे, सिद्धेश्वर यांनी सांगितले. आर्थिक विवंचनेतून आत्महत्या करणाºया पुरुषांचे प्रमाण केवळ दोन टक्के आहे.>३० ते ४४ वयोगटांत सर्वाधिक आत्महत्या१५ ते २९ वयोगटांतील पुरुषांचे आत्महत्यांचे प्रमाण
विवाहित पुरुषांच्या आत्महत्यांमध्ये वाढ, तर महिलांचे प्रमाण घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2018 3:25 AM