ठाणे : आयुष्यभर स्मरणात राहील, अशा मुहूर्तावर विवाह करण्याची जोडप्यांमध्ये एक वेगळीच क्रेझ असते. कदाचित, त्यामुळेच लॉकडाऊनमध्ये नोंदणी पद्धतीने विवाह करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यात सर्वाधिक विवाह जुलैमध्ये झाले आहेत. महाराष्ट्राबाहेर विवाह केलेल्यांनीही ठाणे जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयात विवाह नोंदणी केली आहे.कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाले आणि सर्व व्यवहार ठप्प झाले. अनेकांना आपले विवाह सोहळे रद्द करावे लागले. काहींनी ते पुढे ढकलले. कोरोनाकाळात मोजक्याच नातेवाइकांच्या उपस्थितीत विवाह संपन्न करण्याचे आदेश सरकारने दिले. लॉकडाऊनचे नियम जसे शिथिल होत गेले, तसे रद्द झालेल्या किंवा पुढे ढकललेल्या विवाह सोहळ्यांचे मुहूर्त साधू लागले. या काळात साधेपणाने आणि मोजक्याच नातेवाइकांच्या उपस्थितीत विवाह करण्याचा पायंडा पडला. अनेकांनी तर आॅनलाइनचा आधार घेतला. ज्या नातेवाइकांना विवाह सोहळ्यासाठी दूर जाणे शक्य नाही, त्यांनी आॅनलाइन अक्षता टाकून जोडप्यास आशीर्वाद दिले.मोजक्याच लोकांमध्ये विवाह करायचा म्हणून बहुतांश लोक नोंदणी पद्धतीने विवाह करण्याकडे वळू लागले. मे ते १0 आॅगस्टपर्यंत जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयात जिल्ह्यातील ३३0 जोडपे विवाहबद्ध झाले. यात जुलै महिन्यात १८१ जोडप्यांनी विवाह केले. लॉकडाऊनपूर्वी जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयात दररोज २0 ते २५ विवाह संपन्न होत. १४ फेब्रुवारी, अक्षयतृतीया किंवा एखाद्या अनोख्या मुहूर्तावर ही संख्या वाढलेली दिसायची. यंदा लॉकडाऊन असतानाही ही संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयाने सांगितले. राज्याबाहेर विवाह केलेल्या ३४ जोडप्यांनी येथे नोंदणी केली आहे. लॉकडाऊनकाळात विवाह नोंदणीसाठी जिल्ह्यातून ५६६ नोटिसा, तर राज्याबाहेरून ३८ नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राबाहेरील अशा पद्धतीच्या झालेल्या विवाहांची नोंदणी या कार्यालयात इतर विवाह पद्धतीने करता येते, त्याला अदर मॅरेज किंवा इतर विवाह म्हणतात. २३ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत एकही विवाह झाला नव्हता. एप्रिल महिन्यात शेवटच्या आठवड्यात प्रायोगिक तत्त्वावर विवाह नोंदणी सुरू केली असली, तरी लोकांच्या मनात भीती असल्याने या महिन्यात संख्या शून्य होती, असे कार्यालयाने सांगितले.लॉकडाऊन काळातजिल्हा विवाह नोंदणी कार्यालयात झालेले विवाहमे 36जून 81जुलै 181१0 आॅगस्टपर्यंत 32इतरविवाह पुढीलप्रमाणेमे ७जून ११जुलै १६ १0 आॅगस्टपर्यंत 0
लॉकडाऊनमध्ये नोंदणी विवाह करणाऱ्यांची वाढली संख्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 1:02 AM