ठाणे : महागाई भत्याची थकबाकी मिळावी, वेतनवाढीची थकबाकी, गणवेशाचे कापड वाढीव शिलाई भत्यासह मिळाले आदींसह विविध मागण्यांसाठी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी वंदना डेपो येथे मंगळवार पासून बेमुदत उपोषणाची हाक दिली आहे. अद्यापही त्यांच्या या उपोषणावर एसटी महामंडळाकडून किंवा प्रशासनाकडून दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे जो पर्यंत न्याय मिळत नाही तो पर्यंत उपोषण सुरुच ठेवणार असल्याची माहिती मान्यताप्राप्त महाराष्टÑ एसटी कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
एककीडे एसटीच्या ताफ्यात नवीन इलेक्ट्रीक बस दाखल होत असतांनाच दुसरीकडे एसटीच्या कर्मचाºयांनी ठाण्यात उपोषणाचे हत्यार उपसले आहे. मंगळवार पासून हे उपोषण ठाण्यातील वंदना डेपो येथे सुरु करण्यात आले आहे. यात २०१८ पासूनची महागाई भत्याची थकबाकी मिळावी, एप्रिल २०१६ ते आॅक्टो. २०२१ ची वार्षिक वेतनवाढीची थकबाकी मिळावी, २०१६ ते सप्टेंबर २०२१ पर्यंतची घरभाडे भत्याची थकबाकी, मुळ वेतनात जाहीर केलेल्या ५ हजार ४ हजार व २५०० अनामोली दूर करा, कर्मचाºयांना शासकीय कर्मचाºयांएवढे वेतन मिळण्यासाठी ७व्या वेतन आयोग लागू करा, २०१६, २०२० च्या अनुषंगाने एकतर्फी केलेल्या ४८४९ कोटी मधील शिल्लक रक्कम मूळ वेतनात समाविष्ट करा.
वैद्यकीय बिलांची प्रतिपूर्ती ऐवजी कैशलेस योजना सुरु करावी, अपहार प्रवण बदल्या रद्द करा, आयुर्माण संपलेल्या बस चलनातून काढून टाका व स्वमालकीच्या लालपरी घ्या, चालक वाहक वेळापत्रकात त्रुटी दूर करा, १० ते १२ वर्षापासून टीटीएस वर असलेल्या कर्मचाºयांना टीएस घ्या, सेवानिवृत्त झालेल्या व होणाºया कर्मचाºयांना निवृत्ती वेतन मिळण्यासाठी येणाºया अडचणी दूर कराव्या, कामगारांना व त्यांच्या कुटुंबियांना फरक न भरता सर्व प्रकारच्या एसटी बसमध्ये एक वर्षासाठी मोफत पास देण्यात यावा, सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांच्या पती पत्नीसह एक वर्षाचा मोफत पास सर्व प्रकारच्या बसमध्ये फरक न भरता देण्यात यावा, सेवानिवृत्त कर्मचाºयाच्या देय रकमा तत्काळ द्या, हिट अॅण्ड रनचा कायदा रद्द करा अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत.