ठाणे : ध्वनिप्रदूषणाबाबत तक्रारी स्वीकारण्यासाठी ठाणे आयुक्तालयात प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे. या पोलीस ठाण्यांवर १० सहायक पोलीस आयुक्त देखरेख ठेवणार असून ही तक्रार त्या-त्या पोलीस ठाणे, नियंत्रण कक्ष आणि सहायक आयुक्त कार्यालयातील दूरध्वनी तसेच त्यांना दिलेल्या ई- मेल आयडीवर करता येणार आहे. यानुसार, तक्रार नोंदविण्याचे आवाहन ठाणे पोलिसांनी केले आहे.ध्वनिप्रदूषणाबाबत उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिके च्या सुनावणीदरम्यान, यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने विविध आदेश दिले आहेत. त्यामध्ये ध्वनिप्रदूषणाबाबत तक्रारी स्वीकारण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करावी, असे म्हटले आहे. त्यानुसार, ठाणे पोलीस आयुक्तालयांतर्गत असलेल्या ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर अशा चार महापालिकांचा समावेश असून या प्रत्येक महापालिकांतर्गत पोलिसांचे स्वतंत्र नियंत्रण कक्ष अस्तित्वात आहेत. त्याचबरोबर आता आयुक्तालय कार्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या ३३ पोलीस ठाण्यांत स्वतंत्र कक्ष सुरू केले आहेत. तेथे तक्रार स्वीकारण्यासाठी एक स्वतंत्र रजिस्टर ठेवले आहे. तसेच तक्रारीसाठी १०० हा टोल फ्री नंबर दिला आहे. त्याच्यासह ठाणे शहरासाठी १०३, तर भिवंडी, कल्याण, उल्हासनगर या नियंत्रण कक्षांसाठी १०९१ हा टोल फ्री क्रमांक दिला आहे. तसेच त्या-त्या नियंत्रण कक्षांचे वेगवेगळे ई-मेल आयडी तयार करण्यात आले आहेत. (उदा. ू१ङ्म_३ँंल्ली@३ँंल्लीस्रङ्म’्रूी.ङ्म१ॅ ) त्याचबरोबर प्रत्येक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या नावाने आयडी तयार केले आहेत. (उदा. २१स्र्र_ल्लं४स्रंंि@३ँंल्लीस्रङ्म’्रूी.ङ्म१ॅ) तसेच देखरेख ठेवणाऱ्या सहायक पोलीस आयुक्तांच्या नावानेही आयडी बनवले आहेत. (उदा. ंूस्रल्लं४स्रंंि@३ँंल्लीस्रङ्म’्रूी.ङ्म१ॅ) याबाबत नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांकडे नागरिक ांनी तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
गोंगाटाच्या तक्रारींसाठी पोलिसांचे स्वतंत्र कक्ष
By admin | Published: July 18, 2015 11:58 PM