- सचिन सागरे कल्याण - डिफ्फेरेंटली एबल्ड क्रिकेट कौन्सिल ऑफ इंडिया (DCCI) च्या अंतर्गत मुकुल माधव टी -20 मालिका २८ जानेवारी ते ६ फेब्रुवारी या कालावधीत भारत-इंग्लंड या दोन देशात अहमदाबाद येथे खेळवण्यात आली.
भारत-इंग्लंड दोन्ही संघात एकुण 5 टी-20 सामने खेळवण्यात आले असुन शेवटचा सामना हा जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आला.भारतीय संघाने तीन सामने जिंकत ही मालिका ३-२ ने आपल्या नावे केली.
ह्या मालिकेत इंग्लंडचा कर्णधार कॅलम फ्लिन हा मालिकावीर ठरला तर भारतीय संघाचा कर्णधार विक्रांत केणी याने सर्वाधिक १९१ धावा करत उत्कृष्ठ फलंदाजचा पुरस्कार पटकावला. तसेच सन्नी गोयत याने ९ विकेट घेत उत्कृष्ट गोलंदाज पुरस्कार पटकावला तर या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत स्पर्धेतील मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअरचा पुरस्कार रविंद्र संते याने पटकावला.