शहरं
Join us  
Trending Stories
1
बाप-बेटी एकाचवेळी नशीब अजमावणार; निवडणूक शिवाजीनगरमधून लढणार?
2
"बाबा सिद्दीकींपेक्षाही वाईट अवस्था करणार"; सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी, ५ कोटींचाही उल्लेख
3
मविआचा फॉर्म्युला १००-८०-८०...; दोन दिवसांत तोडगा काढून जागावाटप जाहीर करणार, 'या' एका गोष्टीवर एकमत नाही!
4
IPL 2025: काव्या मारनला धक्का! लिलावाआधी दिग्गज क्रिकेटपटूने सोडली SRH ची साथ
5
Success Story : एकेकाळी RBI मध्ये केलंय काम, आता अब्जाधीशांमध्ये आलंय नाव; कोण आहेत सौरभ गाडगीळ?
6
आजचे राशीभविष्य: ५ राशींना धनलाभ, प्रमोशन, पगारवाढ योग; चैतन्य, उत्साहाचा दिवस
7
आसाम नागरिकत्वाचे ‘कलम ६-अ’ वैधच; १९७१ पर्यंत आलेल्यांना नागरिकत्व - सर्वोच्च न्यायालय 
8
राहुचे नक्षत्र गोचर: ५ राशींना लॉटरी, धनलाभाचे योग; स्वप्नपूर्ती, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
9
राष्ट्रवादीच्या आमदारांसमोर पेच; तिकिटासाठी कोणता झेंडा हाती? आधी करतायत चाचपणी 
10
भाजपचे १०५ उमेदवार ठरले; काही विद्यमान आमदारांना मिळणार डच्चू!
11
विषारी दारूकांडातील मृतांची संख्या २९वर; बिहारमध्ये अनेकांचे संसार उघड्यावर, काहींची दृष्टी गेली  
12
खासदारकी तर गेली, आता निदान आमदारकीची इच्छा तरी पूर्ण करा; विधानसभेसाठी पराभूत खासदारांची भाऊगर्दी 
13
कलम ३७० रद्दचा निर्णय कायम ठेवणारे न्या. संजीव खन्ना होणार सरन्यायाधीश; ५१वे सरन्यायाधीश म्हणून ६ महिने राहणार पदाव
14
मुलासमोर लैंगिक संबंध, नग्न होणे लैंगिक छळच; पोक्सो कायद्यानुसार गुन्हा - केरळ हायकोर्ट
15
१३ काेटी लाेक अत्यंत गरीब; १८१ रुपयांपेक्षाही कमी रोजची कमाई, दाेन वर्षांत गरिबीत घट
16
देशाला प्रथमस्थानी ठेवण्यासाठी मतदान करा; मी नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करते - हॅरिस 
17
न्या. संजीव खन्ना नवे सरन्यायाधीश! सरन्यायाधीश चंद्रचूड यांची शिफारस, ११ रोजी शपशविधी
18
भाजपाचा नेता ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश; सावंतवाडीत दीपक केसरकरांची चिंता वाढली?
19
15 विधानसभा उमेदवारांची नावे असलेली यादी व्हायरल; काँग्रेसने सांगितलं सत्य काय?

अवकाळी पावसाचे त्यांनी आधीच दिले होते संकेत...

By admin | Published: March 18, 2017 3:46 AM

राज्यात अवकाळी पाऊस होणार याची पूर्वसूचना आपण आधीच दिल्याचा दावा ठाण्यातील शेखर साळगावकर यांनी केला आहे. साळगावकर हे ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक आहेत.

ठाणे : राज्यात अवकाळी पाऊस होणार याची पूर्वसूचना आपण आधीच दिल्याचा दावा ठाण्यातील शेखर साळगावकर यांनी केला आहे. साळगावकर हे ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक आहेत. हे भाकित वर्तवतानाच मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रेल्वेला मोठा अपघात होणार असल्याचे भविष्यही त्यांनी वर्तवले आहे. मात्र, हा अपघात नेमका कुठे होणार, हे ठिकाण अद्याप त्यांनी जाहीर केलेले नाही. ते लवकरच सांगणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.अवकाळी पावसाच्या आपल्या भाकिताबाबत पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनादेखील कल्पना दिली होती. मात्र, त्यांनी याबाबत योग्य ती खबरदारी न घेतल्यानेच राज्यात सात लाख हेक्टरावरील पिकाचे नुकसान झाले. काही बळी गेले. गांभीर्याने दखल घेतली असती तर कदाचित हे नुकसान काही प्रमाणात तरी कमी करता आले असते असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे. काही दिवसांपासून राज्यातील यवतमाळ, नागपूर, लातूर, पंढरपूर आदी ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. पावसाबाबतचे हे भविष्य आठवडाभर आधीच वर्तवल्याचे ते म्हणाले. शिवाय, साळगावकर यांच्या फेसबुक पेजवर देखील त्याचा उल्लेख असल्याचे ते सांगतात. २०१७ मध्ये राज्यात समाधानकारक पाऊस पडणार असला तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत तो कमी असेल असेही त्यांनी सांगितले. जूनमध्ये तुरळक पाऊस पडणार असून जुलैच्या दुसऱ्या आठड्यापासून पाऊस चांगली हजेरी लावेल, असे भाकीत त्यांनी वर्तवले. (प्रतिनिधी) - येत्या मे अखेर म्हणजेच शेवटच्या आठवड्यात रेल्वेला मोठा अपघात होणार असल्याचेही भविष्य त्यांनी वर्तविले आहे. परंतु,हा अपघात कुठे होणार याची कल्पना मात्र त्यांनी दिलेली नाही. ती लवकरच दिली जाईल, असेही त्यांचे म्हणणे आहे.