शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

इंदोरीकरांवरील गुन्ह्याच्या मागणीसाठी वंचित आघाडीचे ठाण्यात बेमुदत उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2020 7:52 PM

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील शासकीय विश्रामगृहासमोर ते या बेमुदत उपोषणास बसले आहेत. निवृत्ती देशमुख ऊर्फ इंदोरीकर महाराज यांच्या कीर्तनाचा एक व्हिडीओ फेसबुकवर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये इंदोरीकर आरक्षणावरून दिशाभूल करणारे कीर्तन करीत असल्याचा या उपोषणकर्त्यांचा आरोप आहे. शिवीगाळ केल्याच्या आरोपासह कीर्तनातील इंदोरीकर यांच्या विधानामुळे जातीजातींमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयाजवळील शासकीय विश्रामगृहासमोर ते या बेमुदत उपोषणास बसलेशिवीगाळ केल्याच्या आरोपासह कीर्तनातील इंदोरीकर यांच्या विधानामुळे जातीजातींमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यतासहा दिवसांनंतरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्या निषेधार्थ हे बेमुदत उपोषण

ठाणे : भारतीय संविधानातील आरक्षणाच्या तरतुदी आणि चर्मकार समाज यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी लेखी फिर्याद करून सहा दिवसांनंतरही ह.भ.प. इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल केला नसल्याचा आरोप करून वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हा समन्वयक राजाभाऊ चव्हाण, सुखदेव उबाळे आणि अ‍ॅड. राजय गायकवाड यांनी गुरुवारपासून ठाण्यात बेमुदत उपोषण सुरू केले आहे.      येथील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील शासकीय विश्रामगृहासमोर ते या बेमुदत उपोषणास बसले आहेत. निवृत्ती देशमुख ऊर्फ इंदोरीकर महाराज यांच्या कीर्तनाचा एक व्हिडीओ फेसबुकवर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये इंदोरीकर आरक्षणावरून दिशाभूल करणारे कीर्तन करीत असल्याचा या उपोषणकर्त्यांचा आरोप आहे. शिवीगाळ केल्याच्या आरोपासह कीर्तनातील इंदोरीकर यांच्या विधानामुळे जातीजातींमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. या चिथावणीखोर कीर्तनातील वक्तव्याविरोधात चव्हाण यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात लेखी फिर्याददेखील दाखल केलेली आहे. यासंदर्भात चौकशी करून दोन दिवसांत अ‍ॅट्रॉसिटी, संविधानाचा अवमान आणि मराठा समाजाला दलितांविरोधात चिथावणी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आश्वासन पोलीस उपायुक्तांनी २९ फेब्रुवारीला दिले होते. मात्र, सहा दिवसांनंतरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्या निषेधार्थ हे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही किंवा इंदोरीकर प्रसारमाध्यमांसमोर येऊन जाहीर माफी मागत नाहीत. तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले........... 

टॅग्स :thaneठाणेcollectorजिल्हाधिकारी