ठाणे : ठाणे शहराच्या नावलौकिकात भर घालेल असे आंतरराष्टÑीय दर्जाचे इनडोअर जिम्नॅस्टिक सेंटर व स्पोर्टस् कॉम्प्लेक्सचे काम अंतिम टप्यात आले आहे. टीडीआरच्या बदल्यात खासगीकरणातून होणाऱ्या या कामाची पाहणी सोमवारी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली. येत्या एप्रिल महिन्यात याचा शुभारंभ करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले असून यासाठी ३८ कोटींचा खर्च केला आहे.ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्र . ५ मध्ये पोखरण रोड नं २ येथील टाटा समूहाच्या सुविधा भूखंडावर हे जिम्नॅस्टिक सेंटर तयार होत आहे. संपूर्ण ठाणे जिल्ह्यात क्रीडापटूंसाठी एकही वास्तू नाही. ठाणे, मीरा भार्इंदर, कल्याण डोंबिवली येथील खेळाडूंना फक्त सराव करायचा झाला तरी मुंबईला जावे लागते. त्यामुळे ठाण्यातील अनेक खेळाडू ,क्र ीडापटू यांच्याशी बोलल्यानंतर ठाण्यातच आता अशा प्रकारची वास्तु उभी राहिली आहे. या वास्तूचा ठाण्यातून उदयास येणाºया खेळाडूंना मोठा फायदा होणार आहे.टाटा समूहास मिळणार टीडीआर : टाटा समूहाने या जिमनॅस्टिक सेंटरचे बांधकाम पूर्ण करून ही वास्तू मार्च महिन्यात ठाणे पालिकेला हस्तांतरित केल्यानंतर त्या मोबदल्यात त्यांना ठाणे पालिकेकडून कन्स्ट्रक्शन टीडीआर दिला जाणार आहे. या सेंटरच्या बांधकामासाठी टाटा समूहाने ३८ कोटींचा खर्च केला आहे. सेंटरच्या बांधकामावर पालिकेचा एक रु पयाही खर्च झालेला नाही. मात्र, या जिमनॅस्टिक सेंटरमध्ये खेळाडूंना लागणारी साधने व लागणारे साहित्य, खेळाची उपकरणे पालिकेला खरेदी करावी लागणार आहेत.अंतर्गत काम सुरूया जिम्नॅस्टिक सेंटरचे एकूण क्षेत्रफळ तब्ब्ल ८३ हजार चौरस फूट इतके आहे. त्याचे बांधकाम पूर्ण झाले असून सध्या अंतर्गत सजावटीचे काम सुरू आहे. मार्च २०२० अखेरपर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. या सेंटरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा असणार आहेत. ६ प्रकारचे जिम्नॅस्टिक फ्लोअर येथे आहेत. या सेंटरमध्ये ३०० दर्शकांना बसण्याची आसन व्यवस्था तयार केली आहे.एका वेळी १०० वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था, कॅफेटेरिया, स्वछतागृह, म्युझिक रूम, व्हीआयपी रूम, योगा रूम, टीमसाठी रूम, प्रशिक्षकांसाठी जागा, परीक्षकांसाठी रूम अशा सर्व सुविधा येथे दिल्या आहेत. येथे आर्टिस्टिक जिम्नॅस्टिकमध्ये ºिहदमिक ग्रुप, एफ्रोबेटिक फ्लोअर एक्ससाइस, पोम्मेल हॉर्स, बॅलॅन्सिंग बिम, थम्बलिंग, हाय बार आणि अनइव्हन बार असे खेळ खेळता येणार आहेत.
ठाण्यात इनडोअर जिम्नॅस्टिक सेंटर, ३८ कोटींचा खर्च; एप्रिलमध्ये होणार शुभारंभ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 1:16 AM