ठाणे : सध्या मसाल्याचे दर प्रचंड वाढले आहेत. एकीकडे महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले असताना त्यात आता मसाल्यानेही उडी घेतली आहे. १० ते १५ टक्क्यांनी दरात वाढ झाली असल्याचे मसाल्याच्या होलसेल व्यापाऱ्यांनी सांगितले.
१) असे वाढले दर
मसाला जुने दर नवीन दर
जायफळ ४५० ते ५०० ५५० ते ६००
वेलची १२५० ते १३०० १४५० ते १५००
(७-८ लांबी)
रामपत्री १७५० ते १८०० १८५० ते १९००
लवंग ७५० ते ८०० ८०० ते ९००
मिरे ४५० ते ५०० ५०० ते ५५०
जिरे १७५ ते १८५ १८५ ते २००
लाल मिरची : २६० ३००
कश्मिरी मिरची : ३०० ३५०
२. महागाई सतत वाढत आहे. ती पाठ सोडायचे नाव घेत नाही त्यात मसाल्याचे दर वाढून आणखीन भर घातली आहे. - माधवी पार्टे, गृहिणी
मसाल्यांच्या दरात वाढ झाली. परंतु, त्यामुळे अन्नपदार्थांचे दर वाढविता येत नाही कारण ते वापरण्याचे प्रमाण कमी असते.
- प्रशांत ठोसर, स्नॅक्स कॉर्नरचे मालक
३. सध्याचे वातावरणात भाव कमी जास्त हाेत आहे. काेविडमुळे आता सगळीच गणितं बदलत चालली आहेत.
- सुहास बाविस्कर, होलसेल व्यापारी
लाल मिरच्यांप्रमाणे गरम मसाल्याचेदेखील दर वाढले आहेत. लॉकडाऊनचा फटका बसला असल्याने ते वाढले आहेत. परंतु, मी मालवणी आणि लाल तिखट मसाल्याचे दर वाढविले नाहीत.
- शुभांगी कदम, मसाला विक्रेत्या