- पंकज रोडेकर ठाणे : रस्ता अपघात असो किंवा एखादी घटना असो त्या संदर्भात माहिती देणाऱ्यांना पोलीस ठाण्याच्या चकरा मारायला लागतात. त्यामुळे शक्यतो नागरिक पोलिसांपासून दोन हात लांब राहतात. त्यातच, आता रेल्वे अपघाताची प्रथम खबर देणाºयांची माहिती ठाणे लोहमार्ग पोलिसांनी रेल्वे प्रशासनाकडे मागितली आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाने या गोष्टीला विरोध दर्शवला आहे. तसेच प्रथम खबर देणाºयाची माहिती घेण्यापेक्षा जखमीला तत्काळ उपचार कसे मिळतील ही बाब महत्त्वाची आहे. जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुमचा एक कर्मचारी रेल्वेच्या उपप्रबंधक कार्यालयात बसवा, उत्तर पोलिसांना दिले असल्याचे रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.ठाणे लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीत ठाणे,कळवा, मुंब्रा, दिवा ही मध्य रेल्वे आणि ऐरोली हे ट्रान्स हार्बर या मार्गावरील महत्तवाची स्थानके आहेत. दिवसेंदिवस या स्थानकांतून प्रवास करणाºयांची संख्या वाढत आहे. त्यातच, या वाढत्या गर्दीतून प्रवासादरम्यान पडून किंवा रेल्वे क्रॉसिंग करताना, रेल्वे अपघातांची संख्या वाढताना दिसत आहे.अशा अपघातांची माहिती एखादा रेल्वे प्रवासी रेल्वे प्रबंधक कार्यालयात किंवा रेल्वे कंट्रोल रूमला देतो. त्या माहितीच्या आधारे रेल्वे प्रबंधक कार्यालयातील कर्मचारी, हमाल तातडीने घटनास्थळी पोहोचतात. त्यानंतर, त्या अपघाताबाबत रेल्वेकडून ठाणे लोहमार्ग पोलिसांना लेखी मेमोद्वारे माहिती दिली जाते. त्यानुसार रेल्वे अपघातांची नोंद लोहमार्ग पोलीस ठाण्यात दाखल होते.हा प्रकार नित्यनियमाने कित्येत वर्षे सुरू असताना आता अचानक काही दिवसांपूर्वी ठाणेलोहमार्ग पोलिसांनी एक पत्रक काढून ते रेल्वे प्रबंधक कार्यालयाला धाडले आहे. त्यामध्ये जो कोणी रेल्वे अपघातातील जखमी किंवामयतची प्रथम खबर देतो किंवा ज्या कोणी जखमी किंवा मयत यांना पाहतो, त्यांचे नाव, पत्ता, मोबाइल नंबर अशी माहिती द्यावी अशी माहिती मागितली आहे.>रेल्वे प्रवासात झालेल्या अपघाताची तातडीने माहिती देणाºयाचे स्वागत करण्याऐवजी अशाप्रकारे माहिती घेणे हे चुकीचे आहे. त्यामुळे लोहमार्ग पोलिसांनी त्या व्यक्तीच्या माणुसकीचा विचार करावा, तसेच अशाप्रकारच्या गोष्टींना प्रवासी संघटनेचा कायमस्वरूपी विरोध राहील. तसेच असे केल्यास कोणीही रेल्वे अपघाताची माहिती देणार नाही.’’- नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, ठाणे रेल्वे प्रवासी संघटना.
लोहमार्ग पोलिसांना हवी खबऱ्याची माहिती, रेल्वे प्रशासनाचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 12:39 AM